Share

हास्यजत्रा सोडून ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये का गेला? गौरव मोरेने अखेर सांगितलं ‘ते’ गुपित; म्हणाला…

गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये जाण्याचं खरं कारण सांगितलं आहे. कामातील तोचतोचपणा आणि शिकण्याची भूक यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.

Published On: 

Gaurav More Interview: हास्यजत्रा का सोडली? गौरवचा खुलासा

“फिल्टरपाड्याचा बच्चन” म्हणून ज्याने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं, तो गौरव मोरे (Gaurav More) अचानक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून गायब झाला आणि चाहत्यांना जबर धक्का बसला. हास्यजत्रा सोडली, मग हिंदी शो केला आणि अचानक ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये एन्ट्री घेतली. हे सगळं पाहून चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न होता “जर स्किटच करायचं होतं, तर हक्काची हास्यजत्रा का सोडली?” अखेर या प्रश्नाचं उत्तर गौरवने दिलं असून त्याने मनातली खदखद बोलून दाखवली आहे.

एका पॉडकास्ट मुलाखतीत गौरवने यावर मोठा खुलासा केला. तो म्हणाला की, एकाच पद्धतीचं काम करून थोडा “तोचतोचपणा (Monotony)” आला होता. एप्रिल २०२४ मध्ये हिंदी शो केल्यानंतर गॅप होता आणि २०२५ मध्ये ‘चला हवा येऊ द्या’ स्वीकारल.

Gaurav More Interview

हास्यजत्रा सोडून ‘चला हवा येऊ द्या’ निवडण्यामागचं कारण सांगताना गौरव म्हणाला, “तिथे कलाकार वेगळे आहेत, त्यांचा अनुभव दांडगा आहे. मला तिथे जाऊन नव्याने शिकायचं होतं. जरी मी इथे जुना असलो तरी तिथे गेल्यावर मी शून्यावर होतो. प्रत्येकाची टायमिंग आणि शैली शिकण्यासाठी मी हा निर्णय घेतला.”

यावेळी गौरवने आपल्या जुन्या सहकाऱ्यांवरही स्तुतिसुमने उधळली. ओंकार भोजनेबद्दल बोलताना तो म्हणाला, “ओंकारसारखा नट पुढच्या १० वर्षात होणे नाही, त्याच्याकडे एक वेगळीच जादू आहे.” तर समीर चौगुले यांच्या कामावरील निष्ठेचं कौतुक करताना त्याने त्यांना ‘मल्टी टॅलेंटेड’ म्हटलं. गौरवच्या या वक्तव्याने आता पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वात (Marathi Entertainment Industry) चर्चांना उधाण आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही