Share

अंशुमन विचारेच्या पत्नीसोबत भयंकर प्रकार, ‘तिचं अर्ध भांडं रक्त काढलं…’; अभिनेत्याचा वैद्यकीय क्षेत्राबाबत मोठा खुलासा

आयुर्वेदिक उपचारासाठी गेलेल्या अंशुमन विचारेच्या पत्नीचं डॉक्टरांनी अर्ध भांडं रक्त काढल्याने तिला थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला आहे.

Published On: 

Anshuman Vichare interview shocking revelation about wife ayurvedic treatment

🕒 1 min read

एखाद्या साध्या आजारावर उपचार घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि तिथे तुमचा जीवच धोक्यात आला तर? असाच काहीसा अंगावर काटा आणणारा प्रकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अंशुमन विचारे (Anshuman Vichare) याच्या पत्नीसोबत घडला आहे.

अंशुमनची पत्नी पल्लवी विचारे हिने काही दिवसांपूर्वी एका आयुर्वेदिक उपचारादरम्यान (Ayurvedic Treatment) आलेला भयानक अनुभव युट्यूबवर शेअर केला होता. “मी मरता मरता वाचले,” असं पल्लवीने या व्हिडीओत म्हटलं होतं. आता याच प्रकरणावर स्वतः अंशुमनने मौन सोडलं असून एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Anshuman Vichare Wife Treatment 

नुकत्याच ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत अंशुमनने हा थरारक प्रसंग सांगितला. पल्लवीला हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम कमी असल्याचा त्रास होत होता. त्यामुळे ती सेकंड ओपिनियन घेण्यासाठी मैत्रिणीच्या सल्ल्याने एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेली.

तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला ‘रक्त शोषण’ नावाची काहीतरी प्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं. अंशुमनच्या सांगण्यानुसार, या प्रक्रियेत त्या डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कॅप्सूलसारख्या भांड्यात पल्लवीचं चक्क अर्ध भांडं रक्त काढून घेतलं.

आधीच हिमोग्लोबिन कमी असल्याने, इतकं रक्त काढल्यावर पल्लवीला तिथेच भोवळ आली आणि तिला थेट हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करावं लागलं. हा प्रसंग आठवून आजही अंशुमनच्या अंगावर काटा येतो.

या घटनेतून धडा घेत अंशुमनने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “मी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला दोष देत नाहीये. पण ५० टक्के डॉक्टर असेही असतात जे फक्त डिग्री घेऊन बसलेले असतात. त्यामुळे कोणत्याही डॉक्टरकडे जाताना दहा वेळा विचार करा,” असा मोलाचा सल्ला त्याने दिला आहे.

समाजात जागरूकता निर्माण व्हावी म्हणूनच पल्लवीने तो स्वतःचा व्हिडीओ शेअर केल्याचंही अंशुमनने यावेळी आवर्जून सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही