🕒 1 min read
कोणत्याही सामान्य माणसासाठी आपल्या नव्या घरात एखाद्या सुपरस्टारने अचानक पाऊल ठेवणं ही किती मोठी गोष्ट असू शकते? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम आपला लाडका अभिनेता गौरव मोरेच्या (Gaurav More) बाबतीत नुकतंच अगदी हेच घडलंय.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेणाऱ्या गौरवच्या घरी चक्क बॉलिवूडचा दिग्गज कॉमेडियन जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांनी अचानक भेट दिली. या भेटीचा एक भावूक व्हिडिओ गौरवने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, सध्या सोशल मीडियावर याच भेटीची आणि व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे.
Gaurav More News
जॉनी लिव्हर यांच्या अचानक दिलेल्या भेटीने गौरव पूर्णपणे भारावून गेला. व्हिडिओ शेअर करताना तो म्हणाला, “काय पाऊस लागलाय ना? आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट घडली आहे. हे सरप्राईज सत्यात उतरण्यासाठी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल.”
पुढे गौरवने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिलं की, “प्रिय जॉनी लिव्हर सर, आज तुमचे पाय आमच्या वास्तूला लागले आणि आम्ही खऱ्या अर्थाने धन्य झालो. कधीकाळी तुमचे सिनेमे पाहण्यासाठी दारात किंवा खिडकीत उभं राहून धडपड केली होती. तुम्ही आमच्यासाठी एक मोठी ऊर्जा आणि गुरू आहात. असाच आशीर्वाद राहू द्या.”
गौरवच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेता जितेंद्र जोशी यांनी ‘आनंद’ अशी मार्मिक प्रतिक्रिया दिलीय, तर अभिनेत्री हेमांगी कवी हिने ‘तुझा खूप अभिमान वाटतोय गौरी…’ असं म्हणत त्याचं तोंडभरून कौतुक केलंय.
दुसरीकडे, गौरव सध्या यशाच्या शिखरावर आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि अर्शद वारसी, सुनील ग्रोव्हर स्टारर ‘प्रीतम ॲन्ड पेड्रो’ या नव्या वेबसिरीजमध्ये तो नुकताच झळकला असून, त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये निसर्गाचं रौद्ररूप; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला थेट मंदिरे आणि शाळांबाबत मोठा निर्णय!
- अतुल कुलकर्णींचा संताप अनावर, ‘बिनशर्त पाठिंब्या’वरून विचारला अस्वस्थ करणारा सवाल
- ‘लाज नाही वाटत?’ लोक मरतायत, अन् तुम्ही आमदार-खासदार फोडताय; अमित ठाकरेंचा सरकारवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












