Share

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची मोठी झेप, ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी

राजकुमार हिरानींच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ वेब सीरिजमध्ये गौरव मोरेला ऑडिशन न देताच थेट एन्ट्री मिळाली असून, त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.

Published On: 

Gaurav More - Gaurav More talks about his role in Pritam And Pedro web series

बॉलिवूडच्या दिग्गजांसोबत काम करण्यासाठी भल्याभल्या कलाकारांना ऑडिशनच्या रांगा लावाव्या लागतात, पण थेट राजकुमार हिरानींचा (Rajkumar Hirani) फोन आला तर? होय, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम आपल्या लाडक्या ‘फिल्टरपाड्याच्या बच्चन’सोबत असंच काहीसं घडलंय.

गौरव मोरे (Gaurav More) आता केवळ मराठीपुरता मर्यादित राहिलेला नाही. नुकताच तो राजकुमार हिरानी यांच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ या हिंदी वेब सीरिजमध्ये एका चोराच्या भूमिकेत झळकलाय. विशेष म्हणजे, या मोठ्या भूमिकेसाठी गौरवला कोणतीही ऑडिशन द्यावी लागली नाही.

Gaurav More Web Series

‘मुंबई टाईम्स’शी संवाद साधताना गौरवनं या संपूर्ण अनुभवाबद्दल थेट भाष्य केलंय. “राजकुमार हिरानी यांनी बोलावल्यावर पुढचे सगळे प्रश्नच संपतात. त्यांच्यासोबत आधी ‘संजू’मध्ये काम केल्यामुळे त्यांना माझी कामाची पद्धत माहीत होती. त्यामुळे पहिल्याच फोनवर त्यांनी मला भूमिका सांगितली आणि थेट लोकेशनवर बोलावून घेतलं,” असा रंजक किस्सा गौरवनं सांगितला.

याच भूमिकेबद्दल बोलताना गौरव म्हणाला की, भूमिकेच्या लांबी-रुंदीपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं आहे, हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं असतं. हिरानींसारखी मोठी व्यक्ती विशिष्ट कामासाठी स्वतःहून फोन करते, यातच आपण जिंकलो, अशी प्रांजळ कबुलीही त्यानं दिली.

दुसरीकडे, या सीरिजमध्ये दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी आपल्याकडून उत्तम काम काढून घेतल्याचं गौरवनं आवर्जून नमूद केलंय. आपल्या क्लासी कॉमेडी स्टाईल आणि हटके अभिनयाच्या जोरावर गौरवनं हिंदी वेब विश्वात दमदार पदार्पण केलं असून, त्याच्या या नव्या प्रवासाला प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद मिळतोय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही