Share

“बाप मुख्यमंत्री असल्याने सिनेमात काम मिळतंय”, टोमण्यांवर रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर

‘बाप मुख्यमंत्री म्हणून काम मिळालं’, असा टोमणा मारणाऱ्यांना रितेश देशमुखने ‘लॉक अप २’ च्या मंचावरून सडेतोड उत्तर देत आपला २३ वर्षांचा संघर्ष उलगडला आहे.

Published On: 

Riteish Deshmukh Lock Upp - Riteish Deshmukh hosting reality show Lock Upp 2

🕒 1 min read

तुम्हाला वाटतं का की मोठ्या बापाचा लेक असलं की बॉलिवूडमध्ये सगळं आयतं मिळतं? अभिनेता रितेश देशमुखने जेव्हा सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं, तेव्हा त्यालाही याच टोमण्यांचा सामना करावा लागला होता.

सध्या ‘लॉक अप २’ (Lock Upp 2) या शोचं सूत्रसंचालन करणाऱ्या रितेशनं (Riteish Deshmukh) नुकतंच एका एपिसोडमध्ये त्याच्या सुरुवातीच्या स्ट्रगलबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. इंडस्ट्रीत आल्यावर लोकांनी त्याच्या मेहनतीपेक्षा तो ‘मुख्यमंत्र्यांचा मुलगा’ असल्यावरच जास्त फोकस केला. ही घराणेशाहीची ओळख पुसण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला तब्बल २३ वर्षे लागल्याचं त्यानं उघड केलं.

Riteish Deshmukh Lock Upp 2

‘लॉक अप २’ च्या एका टास्कदरम्यान स्पर्धक योगेश रावतवर ‘चीटर’ (फसवणूक करणारा) असल्याचा शिक्का मारण्यात आला. यावर योगेश भावूक झाला. लोक सत्य न जाणता आपल्याला चीटर म्हणत असून, यामुळे कुटुंबाला लाजिरवाणं वाटत असल्याची खंत त्याने बोलून दाखवली.

दुसरीकडे, या स्पर्धकाला आधार देताना रितेशनं थेट स्वतःचाच भूतकाळ उलगडून सांगितला. रितेश म्हणाला, “जेव्हा मी माझा पहिला चित्रपट केला, तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे सगळ्यांचा समज असाच होता की, केवळ वडील मुख्यमंत्री असल्यामुळेच मला काम मिळतंय आणि माझे चित्रपट यशस्वी होत आहेत. मीसुद्धा अशाच विचित्र टप्प्यातून गेलोय.”

त्यामुळेच, बाहेरून जे दिसतं त्यावर लोक लगेच स्वतःचं मत बनवतात, हे रितेशनं योगेशला पटवून दिलं. “लोकांनी लावलेले शिक्के पुसायला वेळ आणि प्रचंड मेहनत लागते.

आज २३ वर्षांनंतर आणि ६० चित्रपटांनंतर मी तुमच्यासमोर उभा आहे. मी ते सर्व शिक्के मोडून काढले आहेत. जर तुमचा दृढनिश्चय असेल, तर हे सगळं शक्य आहे,” असा कानमंत्रही रितेशनं दिला.

आज रितेशनं २००३ मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ पासून ते ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘लय भारी’ आणि ‘वेड’ पर्यंतचा यशस्वी प्रवास करत स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही