Share

भंडारदरा परिसरात निसर्गाचं रौद्ररूप! २४ तासांत ३०० मिमी पाऊस, पर्यटकांसाठी ‘ही’ प्रसिद्ध ठिकाणे तातडीने बंद

भंडारदरा आणि नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. घाटघर, रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे कळसूबाईसह प्रमुख पर्यटनस्थळे बंद.

Published On: 

Ahilyanagar Rain - Heavy rain in Bhandardara dam and Kalsubai peak area

🕒 1 min read

एकाच दिवसात तब्बल ३०० मिलीमीटर पाऊस कोसळला तर काय अवस्था होईल, याची तुम्ही कल्पना करू शकता? होय, अहिल्यानगर (Ahilyanagar Rain) जिल्ह्यातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात सध्या असाच काहीसा थरार पाहायला मिळतोय.

गेल्या चोवीस तासांत या भागाने पावसाचं अक्षरशः रौद्ररूप अनुभवलंय. इथल्या घाटमाथ्यावरील घाटघर आणि रतनवाडीत तर ढगफुटीसारखीच भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Ahilyanagar Rain

नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासन आता पूर्णपणे अलर्ट मोडवर आलंय.

पावसाचा हा रुद्रावतार पाहता प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलाय. कळसूबाई शिखर असो वा ट्रेकर्सच्या गळ्यातील ताईत असलेली सांदन व्हॅली, पर्यटकांना इथे जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

रतनवाडी आणि आजूबाजूच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे रस्तेही तातडीने बंद करण्यात आलेत. ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांच्या खाली जाण्यापासूनही प्रशासनाने रोखले आहे.

दुसरीकडे, शेजारच्या नाशिक (Nashik Rain) जिल्ह्यालाही पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. इगतपुरीमध्ये सर्वाधिक २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल सुरगाणा (१४९ मिमी) आणि त्र्यंबकेश्वरमध्येही (१२५ मिमी) ढगांनी तुफान बॅटिंग केलीये.

या सलग कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिककरांना मात्र थोडासा दिलासा मिळालाय. नाशिक शहराची तहान भागवणारं गंगापूर धरण आता ३७ टक्क्यांवर पोहोचलंय. तर भावली धरण ५६ टक्के भरलं असून, जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा २८ टक्क्यांवर गेलाय. धरण क्षेत्रातील परिस्थितीवर प्रशासनाचं बारीक लक्ष आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही