Share

पुढचे 24 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट

IMD ने मुंबईसह पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट भागांसाठी रेड अलर्ट जारी करत अतिवृष्टी, विजांचा कडकडाट आणि ताशी 80 किमी वेगाच्या वाऱ्यांपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Published On: 

Monsoon Update Red Alert

IMD Alert Mumbai, Maharashtra: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (7 जुलै) देखील कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Alert) मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. अतिवृष्टी, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी मुंबई(Mumbai), कोकण (Kokan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (West Maharashtra) पावसाने अक्षरशः कहर केला. अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाट भागांसाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची, तर काही भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून घाटमाथ्याच्या भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यांचाही इशारा

हवामान विभागाने पावसाबरोबरच वेगवान वाऱ्यांचाही इशारा दिला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागात विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रतितास, तर मराठवाड्यात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

IMD शास्त्रज्ञांचा इशारा

आयएमडीचे शास्त्रज्ञ विक्रम सिंग (Vikram Singh) यांनी सांगितले की, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि पुणे-नाशिकच्या घाट भागांसाठी रेड अलर्ट कायम आहे. पुढील दिवशी मुंबईतील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहू शकतो.

त्यांनी पुढे सांगितले की, मुंबईसाठी दुसरी मोठी चिंता म्हणजे 70 ते 80 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आहेत. अशा वेगवान वाऱ्यांमुळे मोठी झाडे उन्मळून पडू शकतात, तसेच जुन्या इमारती आणि कच्च्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही