Share

अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? राऊतांचा जहरी हल्ला ; ‘जो पेजेला देणार…

अमोल कोल्हे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत संजय राऊतांनी बंडखोर नेत्यांवर कडाडून टीका केली.

Published On: 

Sanjay Raut

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याविषयी कौतुक केले. या कौतुकासह “ऑफर आली तर विचार करेन” या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद (Press Conferance) घेऊन कोल्हेंबाबत विश्वास व्यक्त केला, तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला.

अमोल कोल्हेंवर विश्वास व्यक्त

अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा फुले यांसारख्या स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका साकारणारे कलाकार असल्याने ते आपल्या विचारांशी तडजोड करणार नाहीत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. कोल्हे यांनी शिवसेनेसोबत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या विजयामागे मतदारसंघातील हजारो शिवसैनिकांचे योगदान असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे कोल्हे आपल्या मूळ पक्षातच राहतील, असा दावा त्यांनी केला.

‘जो पेजेला देणार, त्याच्या शेजेला जाणार’

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका करताना राऊत म्हणाले की, “जो पेजेला देणार, त्याच्या शेजेला जाणार” अशीच काहींची मानसिकता झाली आहे. अशा लोकांचा डीएनए (DNA) तपासण्याची वेळ आली आहे. त्यांच्या रक्तात महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे की नाही, याची शंका वाटते, असा घणाघात त्यांनी केला. “ऑपरेशन तुतारी”ची चर्चा करणाऱ्यांनी त्याला ‘ऑपरेशन टायगर’ नव्हे तर ‘ऑपरेशन लांडगे’ म्हणावे, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरेंच्या वक्तव्याला पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षांतराला “देहविक्रीचा प्रकार” म्हटल्याचा संदर्भ देत राऊत यांनी त्यांच्या भूमिकेला समर्थन दिले. पक्ष बदलणारे आणि त्यांना सामावून घेणारे दोघेही तितकेच जबाबदार आहे. यावेळी राऊत यांनी माजी मंत्री सचिन अहिर यांच्या पक्षांतराचाही उल्लेख करत भाजप आणि शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

‘ऑपरेशन कमळ’चाही इशारा

एक दिवस “ऑपरेशन कमळ” त्यांच्याच पक्षात होईल आणि त्यांनाही त्याची कल्पना येणार नाही. आम्ही आमदार-खासदारांना मुलांप्रमाणे जपले, पण सत्तेच्या मोहापायी काही जण दुसऱ्या बाजूला गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेवटी, फोडायला दुसरा पक्ष उरला नाही तर मोदी-शाह स्वतःचाच पक्ष फोडतील, असा टोला राऊत यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही