Share

Ketan Agrawal Case: सिया-चेतनची सुटका होणार? केतन अग्रवाल हत्याकांडात पोलिसांचा ‘प्लॅन B’ तयार

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रत्यक्ष पुरावे नसल्याने पोलिस डिजिटल पुरावे आणि वैज्ञानिक चाचण्यांच्या मदतीने सिया गोयल व चेतन चौधरीविरोधातील केस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Published On: 

Ketan Agrawal Case

पुणे : पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) यांच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू असून, न्यायालयात केस टिकवण्यासाठी ठोस पुरावे जमा करण्यावर भर दिला जात आहे. एका छोट्याशा तपासातील त्रुटीमुळे आरोपींना फायदा मिळू नये, यासाठी पोलिस विशेष काळजी घेत आहेत. (Pune Police Investigation)

प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभाव

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. कारण घटनास्थळी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नाही आणि संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. यामुळे तपास यंत्रणा परिस्थितीजन्य पुरावे मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीच्या काही हायप्रोफाइल प्रकरणांमध्ये तपासातील कायदेशीर त्रुटींमुळे आरोपींना दिलासा मिळाल्याने, यावेळी पोलिस प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत आहेत.

सिया गोयलची पॉलीग्राफ टेस्ट?

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सिया गोयलची पॉलीग्राफ टेस्ट (polygraph test) म्हणजेच लाई डिटेक्टर टेस्ट (Lie Detector Test) घेण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे. कायद्यानुसार पॉलीग्राफ टेस्टचा अहवाल थेट न्यायालयीन पुरावा मानला जात नाही. मात्र, तपासाला नवी दिशा मिळवण्यासाठी आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी ही चाचणी उपयोगी ठरू शकते. या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोबाइल डेटा, लोकेशन, ब्राउझिंग हिस्ट्री आणि डिलीट केलेले संदेश यांसारखे डिजिटल पुरावे तपासात जोडले जाऊ शकतात.

परिस्थितीजन्य पुराव्यांवर तपासाचा आधार

सध्या केतन अग्रवाल हत्याकांडातील केस मुख्यतः परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. घटनास्थळी प्रत्यक्ष हत्या पाहणारा कोणीही साक्षीदार नाही. सीसीटीव्हीमध्ये चेतन चौधरी हुडी घालून फिरताना दिसत असल्याचा दावा आहे, मात्र केवळ या आधारावर हत्येचा आरोप सिद्ध करणे कठीण आहे. पोलिसांनी डमीच्या माध्यमातून घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या डमी आणि प्रत्यक्ष व्यक्तीच्या हालचालींमध्ये फरक असू शकतो.

डिजिटल पुरावे ठरणार महत्त्वाचे

पोलिसांना संशय आहे की, सिया गोयलला केतनसोबत लग्न करायचे नव्हते आणि त्यामुळे चेतनसोबत मिळून कट रचल्याची शक्यता आहे. हा कट सिद्ध करण्यासाठी पोलिस मोबाइल डेटा, कॉल रेकॉर्ड, लोकेशन हिस्ट्री, इंटरनेट सर्च आणि इतर डिजिटल पुरावे गोळा करत आहेत. तपास यंत्रणेसाठी या प्रकरणात डिजिटल पुरावे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही