🕒 1 min read
प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या धडक कारवायांची चर्चा तर राज्यभर असते, पण त्यांचा दरारा आता थेट मराठी नाटकाच्या रंगमंचावर पोहोचला तर? होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत.
सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेल्या ‘ऑल द बेस्ट’ (All The Best Natak) या सुप्रसिद्ध कॉमेडी नाटकात चक्क मुंढे साहेबांच्या कारवाईचा संदर्भ आला आहे. ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan) याने नुकताच या नाटकातील एक भन्नाट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय.
Nikhil Chavan All The Best Natak
अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या भेसळ माफियांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. याच धडक कारवाईची दखल घेत नाटकाच्या संहितेत एक जबरदस्त पंच पेरण्यात आलाय. या नाटकात निखिल चव्हाणसोबत मयुरेश पेम आणि मनमीत पेम यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
व्हायरल झालेल्या या सीनमध्ये निखिल चव्हाण एका अभिनेत्रीसमोर चायनीजच्या गाडीचा संदर्भ देताना म्हणतो, “हा Chang याची चायनीज फूडची गाडी आहे. पण तू घाबरू नको… तुकाराम मुंढे साहेब इथे स्वतः याच्या गाडीवर येऊन खातात.”
हा भन्नाट संवाद ऐकताच नाट्यगृहात प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. सध्या सुरू असलेल्या मुंढे साहेबांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा सीन अगदी अचूक टायमिंग साधतो.
खुद्द निखिलने शेअर केलेल्या या व्हिडिओवर सध्या नेटकरी तुफान लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. प्रशासकीय कारवाईचा असा विनोदी आणि कल्पक वापर केल्याने प्रेक्षकांकडूनही या सीनला विशेष दाद मिळत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गौरव मोरेच्या घरी अचानक पोहोचला ‘कॉमेडीचा बाप’; अभिनेत्याची पोस्ट पाहून सेलिब्रिटीही झाले थक्क!
- नाशिकमध्ये निसर्गाचं रौद्ररूप; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला थेट मंदिरे आणि शाळांबाबत मोठा निर्णय!
- अतुल कुलकर्णींचा संताप अनावर, ‘बिनशर्त पाठिंब्या’वरून विचारला अस्वस्थ करणारा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












