🕒 1 min read
उन्हाच्या तीव्र झळा आणि घामाच्या धारांनी तुम्हीही हैराण झाला आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. निसर्गाचे चक्र कधी बदलेल हे सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा येतोय.
सध्या अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्याने सर्वांनाच घाम फोडलाय. पण, आता यातून लवकरच सुटका होणार आहे. कारण, भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनबाबत (Maharashtra Monsoon Alert) एक मोठी आणि दिलासादायक अपडेट दिली आहे.
Maharashtra Monsoon Alert
दक्षिण-पश्चिम मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून, येत्या २६ मे रोजी तो केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता आहे. मान्सूनची चाहूल लागताच हवामान खात्याने देशभरातील किमान १० राज्यांना मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या वादळांचा मोठा अलर्ट दिला आहे.
तसेच काही ठिकाणी वीज कोसळण्याचाही इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, १९ ते २२ मे दरम्यान जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. तर, अंदमान-निकोबार बेटांवरही १९ ते २४ मे दरम्यान पावसाचा जोर पाहायला मिळेल.
आता साहजिकच प्रश्न पडतो, महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी होणार? सध्या इंटरनेटवर ‘Maharashtra Monsoon Alert’ कडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अरबी समुद्राकडून बंगालच्या उपसागरात मान्सून सक्रिय झाल्याने महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकासह मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. याचाच परिणाम म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय.
येत्या काही दिवसांत सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात. सोबतच रत्नागिरी, सातारा, आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातही पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. विदर्भातील अनेक जिल्हे सध्या उष्णतेने अक्षरशः पोळून निघाले आहेत. पण, या पावसामुळे तापमानाचा पारा घसरून पुढच्या आठवड्यात महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार हे नक्की!
📌 महत्वाच्या बातम्या
- माझ्यासाठी हाच खरा रेड कार्पेट………कोकण हार्टेड गर्लची अशोक सराफांबद्दल भावुक पोस्ट
- प्राजक्ता माळीचा ‘कान्स’मध्ये मराठमोळा लूक; रेड कार्पेटवर केलं असं काही की परदेशीही झाले थक्क!
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चांदी एकाच दिवसात तब्बल ७ हजारांनी महागली, आता सोन्याचं काय होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












