Share

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चांदी एकाच दिवसात तब्बल ७ हजारांनी महागली, आता सोन्याचं काय होणार?

केंद्र सरकारच्या आयात निर्बंधांनंतर चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे सोन्याचे दर मात्र सध्या स्थिर आहेत.

Published On: 

Gold Silver Price Today: चांदी ७ हजारांनी महागली!

तुम्ही जर येत्या काही दिवसांत सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा! कारण एका रात्रीत असं काही घडलंय ज्याने संपूर्ण सराफा बाजारात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचे चटके आता थेट आपल्या खिशाला बसू लागले आहेत. केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर मोठे निर्बंध लादल्याचा थेट फटका बाजाराला बसला असून, चांदी तब्बल ७ हजार रुपयांनी महागली आहे. रविवारी (१७ मे) जीएसटीशिवाय २ लाख ६३ हजार रुपये प्रतिकिलो असणारी चांदी आज थेट २ लाख ७० हजार रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Gold Silver Price Today

चांदीच्या आयातीबाबत सरकारने मोठा निर्णय घेत ती मुक्त श्रेणीतून मर्यादित श्रेणीत टाकली आहे. या निर्णयाचा तात्काळ परिणाम म्हणून Gold Silver Price Today मध्ये हा मोठा बदल पाहायला मिळाला. चांदीने एवढी मोठी उसळी घेतली असली तरी, सोन्याचे दर मात्र १ लाख ५६ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहेत, हीच काय ती ग्राहकांसाठी थोडी दिलासादायक बाब मानली जात आहे.

पुढील काळात काय होणार?

सराफा व्यावसायिकांच्या मते, आयात मर्यादित झाल्याने चांदीचे दर इथून पुढे आणखी भडकण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, टाटा म्युच्युअल फंडाच्या ताज्या अहवालातही येत्या काळात सोन्या-चांदीच्या दरात ५ टक्क्यांपर्यंत चढउतार दिसू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढ, डॉलरची मजबुती आणि विशेषतः अमेरिका व इराण यांच्यातील वाढता भू-राजकीय तणाव यामुळे बाजारात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

तिकडे जागतिक पातळीवरही मोठी उलथापालथ सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या नव्या कडक इशाऱ्यानंतर आशियाई शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जपानचा निक्केई ०.२ टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी २ टक्क्यांहून अधिक गडगडला.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील या घडामोडी पाहता, गुंतवणूकदारांनी आणि ग्राहकांनी सध्या सावध पावले उचलण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install