Share

विधान परिषद निवडणूक: तब्बल १७ जागांचा महासंग्राम जाहीर, कोणाची खुर्ची धोक्यात?

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Published On: 

Mahapalika Election | Pune Bogus Voting

मुंबई – गेली दोन-अडीच वर्षे ज्या घोषणेची संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होता, ती अखेर झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांमुळे तब्बल १७ आमदार जागांविना रिकामी राहिलेली सभागृहाची बाके आता पुन्हा भरणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी बिगुल फुंकला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार आगामी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून संपूर्ण राज्यात यामुळे आतापासूनच राजकारण तापलं आहे.

Vidhan Parishad Election 2026 

या मोठ्या निवडणुकीसाठी १ जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येतील, तर २ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ जून ही शेवटची मुदत असणार आहे.

त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. एकूण १७ जागांपैकी सोळा जागांवर नियमित तर एका जागेवर पोटनिवडणूक होत असून नागपूरच्या जागेचा त्यात समावेश आहे. या सर्व जागांवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येक गटाने आपली ताकद पणाला लावली आहे.

धक्कादायक माहिती अशी की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न झाल्याने या जागा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रिक्त होत्या. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या नागपूर मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

एकूण ७८ सदस्य संख्या असलेल्या विधान परिषदेत २२ आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडले जातात. मात्र, संबंधित मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के मतदार संख्या उपलब्ध असेल तरच विधान परिषदेची निवडणूक घेता येते, हा तांत्रिक नियम पूर्ण झाल्याने अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर, अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर), ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक आणि अमरावती या स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या जागांसाठी हा रणसंग्राम होणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल करण्याची जोरदार रणनीती आखली आहे. दुसरीकडे, या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवरील प्रमुख नेत्यांची आणि महायुती तसेच महाविकास आघाडीच्या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने येत्या दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार यात तिळमात्र शंका नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही