Share

केंद्र सरकारचा चांदीला थेट दणका; ‘त्या’ एका निर्णयाने बाजारात मोठी खळबळ आणि आयातदारांची कोंडी!

केंद्राने चांदीच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले असून आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन वाचवण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published On: 

Silver Import Ban: केंद्राचा चांदीला दणका!

🕒 1 min read

तुम्हालाही वाटतंय का की चांदी खरेदी करावी? थोडं थांबा! कारण अर्थकारणात कधी काय होईल याचा काहीच नेम नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. सोने-चांदीच्या (Gold Silver) बाबतीत केंद्र सरकार सध्या चांगल्याच ॲक्शन मोडमध्ये आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच नागरिकांना पुढील एक वर्ष सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं. आता यापाठोपाठ सरकारने थेट चांदीला (Silver Import Ban) मोठा दणका दिला असून, बाजारात एकच खळबळ उडाली आहे.

Silver Import Ban

आता चांदी मुक्त श्रेणीतून थेट ‘प्रतिबंधित’ श्रेणीत टाकण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात चांदीच्या आयातीत तब्बल १५७ टक्क्यांनी मोठी वाढ झाली होती. त्यामुळे परकीय चलनावर येणारा ताण कमी करण्यासाठी सरकारने चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे.

या नव्या अधिसूचनेनुसार, आता चांदीची आयात करायची असल्यास सरकारी मंजुरी आणि परवाना अनिवार्य असणार आहे. पण या निर्णयामागचं खरं कारण काय? सध्या भारताकडे ६९० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे.

पण आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध चिघळताना दिसत आहे. हे युद्ध आणखी लांबल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा क्षेत्रावर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठीच सरकारने ही सावधगिरी बाळगत आयात नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!