Share

सचिनच्या घरात सनई-चौघडे; थेट मोदींना दिलं लग्नाचं आवतन, पण ‘ती’ करोडपती सून आहे तरी कोण?

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन विवाहबंधनात अडकणार असून, खुद्द सचिनने सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांना लग्नाचं खास आमंत्रण दिलंय.

Published On: 

Arjun Tendulkar Wedding: अर्जुनची करोडपती सून कोण?

क्रिकेटच्या देवाची म्हणजेच सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) सून नेमकी कोण असणार? या एका प्रश्नाची गेले अनेक दिवस मोठी चर्चा होती. पण आता यावर अखेर पडदा पडलाय! अर्जुनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली असून थेट पंतप्रधान दरबारी सनई-चौघड्यांची निमंत्रणं पोहोचली आहेत.

खुद्द सचिन तेंडुलकरने संपूर्ण कुटुंबासह थेट दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीये. निमित्त आहे ते अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar Wedding) लग्नाचं. अर्जुन आणि त्याची होणारी पत्नी सानिया यांनी यावेळी पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतले. स्वतः सचिननेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत याला दुजोरा दिलाय. “तरुण जोडप्याला आशीर्वाद आणि सल्ला दिल्याबद्दल मोदीजींचे आभार”, असं सचिनने या पोस्टमध्ये आवर्जून म्हटलंय.

Arjun Tendulkar Wedding

नुसते पंतप्रधानच नाही, तर त्याआधी सचिन आणि अंजली तेंडुलकरने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही त्यांच्या १० जनपथ या निवासस्थानी भेट घेत लग्नाचं खास आमंत्रण दिलंय. यामुळे अर्जुनच्या शाही विवाहसोहळ्याला देशातील दिग्गज राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळणार हे नक्की.

पण सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या नजरा खिळल्यात त्या अर्जुनची होणारी बायको सानिया चांडोक हिच्यावर. ही सानिया आहे तरी कोण? सानिया ही मुंबईतील बडे उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंबाचा हॉस्पिटॅलिटी आणि फूड क्षेत्रात मोठा दबदबा असून, प्रसिद्ध इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ‘ब्रुकलिन क्रीमरी’ या आयस्क्रीम ब्रँडची मालकी त्यांच्याकडेच आहे. काही दिवसांपूर्वीच अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता.

एकीकडे घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच अर्जुन मैदानातही कमाल करायला सज्ज आहे. मुंबईच्या धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण घेतलेला आणि गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा अर्जुन आता नव्या संघातून आयपीएलमध्ये दिसणार आहे. आगामी आयपीएल हंगामात तो लखनौ सुपर जायंट्सकडून (LSG) खेळताना दिसेल. त्यामुळे यंदा अर्जुनसाठी लग्न आणि क्रिकेट अशी दुहेरी आनंदाची पर्वणीच असणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही