Share

‘मागच्या जन्माची कर्म असतात…’; प्रेमाबद्दल काय म्हणाली प्राजक्ता माळी? ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत प्रेमाबद्दल परखड मत मांडलं आहे. ‘मागच्या जन्माचा शत्रूच जोडीदार बनतो’ हे तिचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Published On: 

Prajakta Mali On Love Marriage: 'तो' तर मागच्या जन्माचा शत्रू!

वयाच्या ३६ व्या वर्षीही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सिंगल का आहे? हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी नक्कीच पडला असेल. पण आता यामागचं खरं आणि थोडं धक्कादायक कारण समोर आलंय.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या सौंदर्याने तरुणांना घायाळ करणारी प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या भलतीच चर्चेत आहे. लव मॅरेज या विषयावर तिनं नुकतंच एका मुलाखतीत केलेलं भाष्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेत्री, निवेदिका आणि यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या प्राजक्तानं प्रेमाची भलतीच वेगळी व्याख्या सांगितली आहे.

Prajakta Mali On Love Marriage

प्रेम आणि लग्न यावर बोलताना प्राजक्तानं चक्क पुनर्जन्म आणि कर्माचा संदर्भ दिलाय. बोलताना ती स्पष्टच म्हणाली, “जे लगेच आणि उत्स्फूर्तपणे वाटतं ते प्रेम नसून केवळ आकर्षण असतं. दोन व्यक्तींमध्ये जेव्हा खोलवर कार्मिक कनेक्शन असतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रेम होतं.”

प्राजक्ताची पुढची फिलॉसॉफी ऐकून तर भल्याभल्यांना घाम फुटेल. ती म्हणते, “मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच या जन्मात तुमचा जोडीदार बनतो.” मागील जन्मातील वैर जितकं सौम्य, तितकं या जन्मातलं नातंही तसंच असतं, असा तिचा दावा आहे. माझं अफाट वाचन असल्यामुळेच प्रेमाची ही संकल्पना पूर्णपणे बदलल्याचं ती मान्य करते.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून तिनं साध्या मुलीची भूमिका साकारली, तर थेट ‘रानबाजार’ वेबसिरीजमध्ये बोल्ड भूमिका करून तिनं खळबळ उडवून दिली. ‘फुलवंती’ आणि ‘चंद्रमुखी’सारख्या सिनेमांमधून तिने स्वतःला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केलंय. पण पडद्यावर इतक्या सहजतेने वावरणारी प्राजक्ता, खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमाच्या बाबतीत प्रचंड वेगळा आणि ‘कार्मिक’ विचार करते, हे यावरून स्पष्ट झालंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही