Share

शुभमन गिलचा स्वतःच्याच संघावर संताप; ‘त्या’ एका चुकीमुळे गुजरातचा पराभव

केकेआरने गुजरात टायटन्सचा २९ धावांनी पराभव करत प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे. या अनपेक्षित पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने संघाच्या खराब कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Published On: 

GT vs KKR 2026: शुभमन गिल संघावर संतापला!

आयपीएलमध्ये कधी कोणाच पारडं जड होईल हे सांगणं कठीण असतं, याचा प्रत्यय काल क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आलाय. आयपीएल २०२६ च्या ६० व्या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या गुजरात टायटन्सला (GT) केकेआरने (KKR) धोबीपछाड दिला.

सलग विजयांची घोडदौड करणारा गुजरातचा संघ या पराभवामुळे चांगलाच बॅकफूटवर गेलाय. KKR vs GT या हाय-व्होल्टेज सामन्यात कोलकाताने ठेवलेलं २४७ धावांचं डोंगराएवढं आव्हान गुजरातला पेलवलं नाही. अखेर त्यांना २९ धावांनी पराभवाची धूळ चाखावी लागली.

Shubman Gill lashes out

या पराभवामुळे गुजरातचं प्लेऑफमध्ये अधिकृत एन्ट्री मारण्याचं स्वप्न थोडं लांबणीवर पडलंय. कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. सामन्यानंतर बोलताना गिल चांगलाच निराश दिसला.

पराभवाचं खापर त्याने थेट स्वतःच्या संघाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणावर फोडलं आहे. तो म्हणाला, “आम्ही तीन सोपे झेल सोडले, त्यामुळे मला वाटत नाही की आम्ही हा सामना जिंकण्याच्या लायकीचे होतो.” गिलचं हे रोखठोक वक्तव्य सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलंच चर्चेत आलंय.

“खेळपट्टी चांगली होती, पण गोलंदाजांसाठी ती सोपी नव्हती. आपण इथपर्यंत मजल मारली ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण क्षेत्ररक्षणात आपण खूपच खराब कामगिरी केली,” अशी खंत गिलने व्यक्त केली. तसेच क्वालिफायर सामन्याआधी असा पराभव पचवणं एका अर्थी चांगलं असल्याचंही तो म्हणाला.

गुजरातने आतापर्यंत १३ पैकी ८ सामने जिंकले असून ते १६ गुणांसह अजूनही दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, त्यांचा नेट रनरेट आता +०.४०० वर घसरला आहे. आता गुजरातचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २१ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, या दमदार विजयामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांनी ११ गुणांसह सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही