Share

‘लता दीदींची बरोबरी अशक्य’; अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लता मंगेशकरांशी संबंधित वादावर प्रथमच भाष्य करत, त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

Published On: 

Anuradha Paudwal

Anuradha Paudwal on Lata Mangeshkar : भारतीय संगीत विश्वात ‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल ( Anuradha Paudwal) यांच्यात बऱ्याच काळापासून तुलना केली जात आली आहे. एक काळ असाही होता जेव्हा अशी चर्चा रंगली होती की, वाढत्या लोकप्रियतेमुळे अनुराधा पौडवाल या लता दीदींना एक पर्याय म्हणून समोर येऊ शकतील.

आपल्या कारकिर्दीतील चढ-उतारांच्या काळात एका वादाची चर्चा सातत्याने होत राहिली, ती म्हणजे, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी अनुराधा पौडवाल यांना पुढे जाऊ दिले नाही. याविषयी अनेक वर्षे विविध तर्क-वितर्क लढवले गेले, तरीही अनुराधा पौडवाल यांनी स्वतः या विषयावर कधीच स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. आता, अनेक वर्षांनंतर त्यांनी अखेर या वादावर मनमोकळेपणाने भाष्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना अनुराधा पौडवाल यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. तसेच या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “माझी अशी धारणा आहे की गुरूची बरोबरी कोणीही करू शकत नाही. गुरूंना फॉलो केलं जातं आणि त्यांचा आदर केला जातो. मी त्यांच्याकडून जेवढं शक्य होतं, तेवढं शिकले.”

त्या पुढे म्हणाल्या, “सतत तुलना करणं हा लोकांचा स्वभावच आहे. म्हणूनच, ‘लता दीदींनी मला पुढे जाऊ दिले नाही’ अशी चर्चा लोकांना सनसनाटी वाटते. पण लतादीदींची कला ज्या शिखरावर होती, त्या शिखराजवळ तरी आधी पोहोचलं पाहिजे. त्यानंतरच तुलना होऊ शकते.”

या मुलाखतीत अनुराधा यांना विचारण्यात आले की, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यापैकी आवडती गायिका कोण आहे. त्यांनी कोणताही संकोच न करता लता मंगेशकर यांचं नाव घेतलं आणि त्यांच्याबद्दलचा आपला आदर पुन्हा एकदा व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही