तुम्ही ७ स्टार हॉटेलमध्ये गेलात तर काय ऑर्डर कराल? साहजिकच एखादा महागडा आणि शाही पदार्थ. पण, कोट्यवधींची संपत्ती असणारे भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) तिथेही फक्त ‘खिचडी’ खातात, असं जर कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?
सध्या सोशल मीडियावर रवी किशन यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका ताज्या मुलाखतीत त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना असा काही दावा केलाय, ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Ravi Kishan Trolled
अभिनेता ते राजकारणी असा यशस्वी प्रवास करणाऱ्या रवी किशन यांच्याकडे आज गडगंज संपत्ती आहे. मात्र, या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी इतकी गरिबी पाहिली आहे की, आजही मोठ्या ७ स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर महागडे पदार्थ मागवण्याची माझी हिंमत होत नाही. मग ते पैसे प्रॉडक्शन हाऊसचे असोत किंवा माझ्या स्वतःचे, मी तिथेही फक्त साधी खिचडीच ऑर्डर करतो.”
एवढंच नाही तर, लॉन्ड्रीमध्ये कपडे धुवायला देण्याऐवजी घरीच कपडे धुण्यावर आपला भर असतो, असंही ते म्हणाले. गोरखपूर असो वा मुंबई, गरिबीचे ते दिवस अजूनही माझ्या डोक्यातून गेलेले नाहीत, अशी अत्यंत भावनिक साद त्यांनी या मुलाखतीतून घातली.
पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनुसार, नेटकऱ्यांना मात्र त्यांचा हा गरिबीचा दाखला फारसा रुचलेला नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत असून अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.
एका युझरने थेट टोला लगावत लिहिलंय, “नेताजी, तुम्ही गरिबी फक्त पाहिली आहे, आम्ही ती रोज जगतोय.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने “आम्ही गरिबी २.० पाहिली आहे,” असा चिमटा काढलाय. एकूणच, सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात रवी किशन सध्या सोशल मीडियावर चांगलेच टार्गेट झाले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर…..’, पंतप्रधान मोदींच्या व्हीडिओवरून किरण मानेंचा थेट हल्ला
- भाजपमध्ये अचानक मोठी उलथापालथ; आमदाराच्या राजीनाम्याने खळबळ
- एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी एक धुरंधर आले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












