Share

‘भाजपमध्ये या नाहीतर ठोकू, गोळ्या घालू’; अभिजीत दीपकेचा खळबळजनक दावा

अभिजीत दीपकेने भाजपकडून धमक्या आणि कुटुंबीयांना त्रास देण्याचा आरोप केला असून भाजपने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Published On: 

Abhijit Dipke

मुंबई : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Dipke) एका आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या निवासस्थानी परतला. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपकेने अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यानी दावा केला की, भाजपच्या(BJP) वतीने त्याला थेट धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच आई-बाबांना सुद्धा घरी जाऊन पाहून घेऊ, असे देखील त्याने म्हटले आहे. (Abhijeet Dipke BJP Threat Allegation Maharashtra)

प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाला, “मला भाजपकडून अनेक ऑफर्स मिळाल्या आहेत, पण मी पक्षात सामील होणार नाही. मला भाजपमध्ये जायचे असते, तर मी कधीच गेलो असतो. मला धमकावण्यात आले: ‘तू भाजपमध्ये सामील हो, नाहीतर आंदोलन मागे घे. आम्ही तुला ठोकू, तुला गोळ्या घालू.’ RSS आणि BJP वापरत असलेली हीच ती ‘प्रेमाची’ भाषा आहे काय की तू ये नाही तर तुझं काही तरी करुन टाकू.

“मी नरेंद्र मोदींच्या नातवाच्या वयाचा आहे”

अभिजित दिपके पुढे म्हणाला की, “अशा प्रकारचे ‘प्रेम’ ते दाखवतात. त्यांनी माझ्या आई-वडिलांनाही लक्ष्य केले आणि म्हटले, ‘आम्ही तुझ्या आई-बाबांना पाहून घेऊ. तुम्ही माझे काय करणार आहात? मी ३० वर्षांचा तरुण आहे. मी नरेंद्र मोदींच्या नातवाच्या वयाचा आहे. कदाचित मी अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचाही असेन. तुमच्या स्वतःच्या नातवंडांच्या वयाच्या लोकांना धमकावताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही नक्की काय करत आहात?”

भाजपचा आरोप फेटाळला

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अभिजीत दीपके यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपमध्ये सामील होण्यासाठी भाग पाडण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्या गेल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यांनी आंदोलन केले, त्यांनी ते त्यांच्या दृष्टिकोनातून केले आणि त्या आंदोलनाला एक चेहरा मिळाला. मात्र, याचा अर्थ असा नाही की कोणालाही वाटेल तसे काहीही बडबडण्याचा अधिकार मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती आंदोलनाचे नेतृत्व करते, तेव्हा तिची जबाबदारी वाढते. भारतीय जनता पक्षाला कोणाला पक्षात सामील करून घेण्यासाठी धमकावण्याची गरज नाही. ” शिवाय, भारतीय जनता पक्षाकडून ऑफर मिळण्याबाबत आमच्यात अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. एखाद्याने असा दावा केलाच असता, तरी तो अधिक स्पष्टपणे मांडायला हवा होता. मात्र, त्यांनी असे नमूद केले की, ती व्यक्ती आता मिळालेली प्रसिद्धी आणि लोकप्रियता यांचा वापर करून जर भाजपवर टीका करत असेल, तर जनता ते स्वीकारणार नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही