देशाचे शिक्षणमंत्री राजीनामा देतात आणि त्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना थेट ‘गटर क्लास’ म्हटलं जातं, हे तुम्ही कधी पाहिलंय का? पेपरफुटीविरोधात जंतर मंतरवर उसळलेल्या जनक्षोभानंतर आता अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut) विरुद्ध अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) हा नवा वाद चांगलाच पेटला आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने थेट दिल्लीला हादरा दिला. जेनझी (GenZ) पिढीने पुकारलेल्या या लढ्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. मात्र, या आंदोलनावर कंगनाने सडकून टीका करत नवा वाद ओढवून घेतला आहे.
Abhijeet Dipke vs Kangana
कंगनाने नुकतेच काही व्हिडीओ शेअर करत या आंदोलनावर आणि जेनझींवर थेट निशाणा साधला होता. आंदोलनाच्या नावाखाली तिथे अश्लीलता सुरू असल्याचा गंभीर आरोप तिने केला. शिवाय आंदोलकांना थेट ‘गटर क्लास’ अशी उपमा दिली.
यावर आता अभिजीत दिपकेने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “कंगनाबद्दल आता काय बोलावं? १५ ते २८ वयोगटातल्या या मुलांना ट्रोल करून तिला नेमकं काय मिळणार आहे?”, असा संतप्त सवाल त्याने उपस्थित केला आहे.
हेच तरुण उद्याचा देश चालवणार आहेत आणि तेच देशाचे नागरिक तसेच मतदार आहेत, याची आठवण दिपकेने करून दिली. सामान्य घरातील या मुलांची खिल्ली उडवण्यावरून त्याने कंगनाला चांगलंच सुनावलं आहे.
याआधीही दिपकेने ‘कंगनाला कोण गांभीर्याने घेतं?’ असा टोला लगावला होता. मात्र, कंगनाकडून वारंवार होणाऱ्या आरोपांनंतर आता हा वाद आणखी तापला आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; 12 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम
- …अन्यथा अमित शहांच्या पुणे भेटीला विरोध करणार; काँग्रेसचा भाजपला इशारा
- मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक; सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात आता येणार ‘हा’ खास पदार्थ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












