Share

मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक; सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात आता येणार ‘हा’ खास पदार्थ?

तमिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात आता आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्र्यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडला आहे.

Published On: 

Thalapathy Vijay considering chicken biryani in mid day meal scheme

शाळेतल्या दुपारच्या सुट्टीत मुलांना अंड किंवा खिचडी मिळणं, हे आपण नेहमीच पाहिलंय. पण, आता चक्क सरकारी शाळेतल्या मुलांना आठवड्यातून एकदा झणझणीत ‘चिकन बिर्याणी’ (Chicken Biryani) खायला मिळाली तर?

होय, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि साऊथ सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) सध्या असाच एक भन्नाट निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेताच त्यांनी २०० युनिट मोफत वीज आणि महिला सुरक्षेसाठी टास्क फोर्स असे मोठे निर्णय धडाधड घेतले.

Thalapathy Vijay News

आता मात्र त्यांचा मोर्चा थेट शालेय विद्यार्थ्यांच्या ‘मिड-डे मील’कडे (मध्यान्ह भोजन) वळला आहे. राज्याच्या सरकारी शाळांमध्ये मुलांना आठवड्यातून एकदा दुपारच्या जेवणात चक्क चिकन बिर्याणी देण्याचा एक तगडा प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राज मोहन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोर ही नवी आणि लक्षवेधी संकल्पना मांडली आहे. तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात शालेय पोषण आहार हा नेहमीच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.

के. कामराज यांनी मध्यान्ह भोजनाचा पाया रचला, तर करुणानिधींनी त्यात अंड्याचा समावेश केला. त्यानंतर एम. जी. आर. आणि जयललिता यांनीही या योजनेत पौष्टिक बदल केले होते.

“हीच जुनी परंपरा पुढे नेत आता मुलांना आठवड्यातून एकदा बिर्याणी देण्याची आमची इच्छा आहे,” असं मंत्री राज मोहन यांनी स्पष्ट केलंय. अर्थात, या प्रस्तावावर मुख्यमंत्री विजय यांनी अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही. सध्या प्रशासकीय पातळीवर या निर्णयाच्या आर्थिक आणि तांत्रिक बाजू तपासून पाहिल्या जात आहेत.

याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये तत्कालीन डीएमके सरकारने प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ‘मुख्यमंत्री नाश्ता योजना’ सुरू केली होती. त्यामुळे मुलांना दोन वेळचं सकस अन्न मिळत होतं. आता थलपती विजय यांनी बिर्याणीच्या या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला, तर शालेय पोषण आहाराच्या इतिहासातील हा एक मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय ठरेल. सध्या तरी या प्रस्तावाची देशभरात जोरदार चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही