Share

तुकाराम मुंढेंना मोठा धक्का; एका निर्णयावरून २९ कर्मचाऱ्यांचं थेट मंत्र्यांना पत्र, प्रशासनात मोठी खळबळ

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन शिफ्टच्या निर्णयाविरोधात २९ कर्मचाऱ्यांनी बंड पुकारत थेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

Published On: 

Tukaram Mundhe FDA Maharashtra Commissioner

तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) आणि वाद हे समीकरण आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. पण ज्या अधिकाऱ्याच्या नावानेच भल्याभल्यांना घाम फुटतो, त्याच अधिकाऱ्याविरोधात आता त्यांच्याच हाताखालच्या कर्मचाऱ्यांनी बंड पुकारलं तर? होय, असंच काहीसं चित्र सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय.

राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) हॉटेल्स, डेअरी आणि रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई सुरू आहे. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा बडगा उगारला जात आहे. पण दुसरीकडे, मुंढेंच्याच कार्यपद्धतीवर छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

Tukaram Mundhe News

एफडीए प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक मनुष्यबळ किंवा अतिरिक्त तांत्रिक सुविधा मात्र देण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, सकाळी ९ वाजल्यापासून ते थेट रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांना राबावं लागत आहे.

एवढंच नाही, तर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. १५ जुलै रोजी हे निवेदन मंत्र्यांना देण्यात आलं असून त्यावर २९ अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांचे प्रलंबित नमुने लवकर निकाली काढण्यासाठी ही घाई केली जात असल्याचं बोललं जातंय. मात्र, यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेशी थेट तडजोड होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

एका अधिकाऱ्याची ठराविक नमुने अचूक तपासण्याची क्षमता असते, त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव टाकल्यास तपासणीच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो, असा थेट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

आता या कर्मचाऱ्यांनी दोन शिफ्टचा निर्णय तत्काळ रद्द करून पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि शनिवार-रविवारच्या सुट्ट्या मिळाव्यात, अशा प्रमुख मागण्या मंत्री झिरवळ यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे आता या तक्रारीवर सरकार काय पाऊल उचलणार आणि स्वतः तुकाराम मुंढे यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही