तुम्हीही हॉटेलमधून चायनीज मागवल्यावर त्यातल्या भडक रंगाकडे बघून कधी विचार केलाय का? आता हे चित्र बदलतंय. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल व्यावसायिकांना चांगलाच दणका दिलाय.
सध्या सगळीकडे मुंढेंच्याच (Tukaram Mundhe) कारवाईची चर्चा आहे. सर्वसामान्यांपासून ते मराठी मनोरंजनसृष्टीपर्यंत सगळेच या धडक कारवाईचं कौतुक करत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनीही नुकताच आपला एक भन्नाट अनुभव शेअर केलाय.
Kedar Shinde on Tukaram Mundhe
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलीय. त्यांनी लिहिलंय, “आज घरी हॉटेलमधून चायनीज मागवलं. एवढंच वाटलं ‘तुका’ म्हणे चायनीज ऐसेची खावे. चायनीजला रंग नाही हो! एकदम निरमा इफेक्ट!” या कॅप्शनसोबत त्यांनी तुकाराम मुंढे यांना टॅग करत ‘रिस्पेक्ट’ असंही म्हटलंय.
शिंदेंच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट्सचा पाऊस पाडलाय. अनेकजण आपापले हॉटेलमधले अनुभव सांगतायत. मे महिन्यात मुंढे यांनी पदभार स्वीकारला. तेव्हापासून तब्बल ३००० हून अधिक ठिकाणी छापे पडलेत.
अस्वच्छ ढाबे, टपऱ्या आणि बनावट पनीर विकणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला गेलाय. अनेकांचे परवाने रद्द झालेत. त्यामुळेच… आता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवातील महाप्रसादावर FDA ची नजर? तुकाराम मुंढेंनी थेटच सांगितला प्लॅन!
- ‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय’; अमित ठाकरेंची जहरी टीका
- राहुल गांधी सनातन विरोधी! कंगनाचा बुरख्यावरून थेट सवाल, रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर मोठा गौप्यस्फोट












