Share

गणेशोत्सवातील महाप्रसादावर FDA ची नजर? तुकाराम मुंढेंनी थेटच सांगितला प्लॅन!

गणेशोत्सव काळात महाप्रसादाच्या आयोजनावर FDA ची नजर असणार का? यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भूमिका स्पष्ट करत नियमांचे पालन करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

Published On: 

Tukaram Mundhe FDA commissioner talking about food safety rules.

Tukaram Mundhe: यंदाच्या गणेशोत्सवात महाप्रसादावर अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धाड पडणार का? हा प्रश्न सध्या अनेक मंडळांच्या मनात आहे. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अशातच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीये. मुंबई प्रेस क्लबमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेटच सांगितलं की, हा विषय कुठल्याही सणाचा नाही, तर थेट नियमांच्या अंमलबजावणीचा आहे.

Tukaram Mundhe on Mahaprasad

“गणेशोत्सव असो वा ईद, नियमात कोणतीही तडजोड नाही,” असं मुंढे स्पष्ट म्हणाले. अन्न सुरक्षा कायद्यानुसार ‘फूड बिझनेस ऑपरेटर’ म्हणून नोंदणी करणं सक्तीचं आहे. त्यामुळे विनापरवाना महाप्रसाद किंवा अन्नपदार्थ बनवणे हा थेट नियमभंग ठरू शकतो. सणांच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी दिला आहे.

जर सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला, तर तात्काळ कारवाई होणार. परवाना थेट रद्द केला जाईल. दुसरीकडे, व्यावसायिकांनी स्वतःहून नियम पाळले, तर आमच्यासारख्या यंत्रणेची गरजच उरणार नाही, असा टोलाही मुंढेंनी लगावला.

मुंढेंच्या या कठोर भूमिकेचा धसका आता रेल्वे प्रशासनानेही घेतलाय. पश्चिम रेल्वेवर सध्या ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ राबवला जातोय. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आदिश पठानिया यांनी जोरदार कारवाई सुरू केलीये.

गेल्या अवघ्या दहा दिवसांत मुंबई सेंट्रल विभागातील तब्बल ३९ खाद्यपदार्थ स्टॉल्स बंद करण्यात आलेत. अस्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर ३१ ऑगस्टपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे.

थोडक्यात सांगायचं तर, मुंढेंच्या दणक्यानंतर आता राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ताळ्यावर आले आहेत. अनेक ठिकाणी किचनची स्वच्छता आणि दर्जा सुधारलाय. नागरिकांकडूनही याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, ग्राहकांना थेट तक्रार करता यावी, यासाठी FDA लवकरच एक नवी यंत्रणाही उभारणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install