Share

‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय’; अमित ठाकरेंची जहरी टीका

अमित ठाकरे यांनी अमित साटम यांच्या राज ठाकरेवरील टीकेला जहरी शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

Published On: 

Amit Thackeray attacks Amit Satam

नागपूर : मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना लक्ष्य केलं आहे. त्यानंतर नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांनी विविध राजकीय आणि विद्यार्थी संघटनेशी संबंधित मुद्द्यांवरही भाष्य केलं. अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे, असे अमित ठाकरे म्हणाले.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरेंनी पाचपावली परिसरात सिंधू महाविद्यालयाला भेट दिली. मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्यता मोहीम काउंटरला भेट देऊन सदस्यता मोहीम प्रक्रियेची माहिती घेतली. याठिकाणी त्यांनी आधी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यानंतर पत्रकार परिषदेत विविध विषयावर भाष्य केलं.

Amit Thackeray attacks Amit Satam

यावेळी, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत त्यांना विचारण्यात आले. साटम यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिले होते की, अशी टीका करण्यापूर्वी त्यांनी आपल्या नातवाला म्हणजेच अमित ठाकरे यांच्या मुलाला ‘बालमोहन विद्यालया’त दाखल करावे. यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

यावर अमित ठाकरे म्हणाले की, “अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे. अशा लोकांवर मी काय बोलू. ज्यांना स्वत:च्या भाषेचं, राज्याचं काहीच पडलेलं नाही. अमित साटम म्हणजे तोच ना जो लोकांच्या मृत्यूवर हसला. लोकांवर झाड पडून, खड्ड्यात पडून मृत्यू झाले त्यावर तो हसला, तो माणूस ठरवणार का माझा मुलगा कुठल्या शाळेत जायला पाहिजे?”

“मी सगळीकडे सभासद नोंदणी करतोय, मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक झाले आहे. आज नागपूरला आलो आहे. कॉलेज पातळीवर काय अडचणी, समस्या आहेत ते जाणून घेतो आहे. आमच्यावेळी परिस्थिती नव्हती, आज संघटना विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे, कधी काही लागले तर आम्ही तुमच्या मागे उभे आहोत,” असे अमित ठाकरे म्हणाले.

पुढे अमित ठाकरे यांनी सांगितले की, “दुर्दैवाने जिकडे जातो तिथे सेल्फी काढतात, पण त्या समस्या सांगत नाही, मला अडचणी जाणून घ्यायची आहेत, मुली त्यांच्या अडचणी सांगत नाहीत. मी इकडे वॉशरूमला गेल्यावर खूप घाण दिसली. फोटो काढण्यासाठी मी आहेच. मला असे तरुणांना भेटायला आवडते, मी भारावून जातो, माझ्या पाठीवर मुले बसतात, मला चर्चा करायला आवडते, हा उत्तम दौरा चालला आहे,”

यावेळी नागपूर दौऱ्यावर असताना अमित ठाकरे यांनी आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केले. “या सरकारला काहीही पडले नाही, गाणी वैगरे सेकंडरी झाले आहे, आदिवासी विद्यार्थी १४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, जीआर रद्द झाला आहे, एक कोटी जाहीर केलेलं अजूनपर्यंत आले नाही” असे अमित ठाकरे म्हणाले.

पेपरफुटीवर भाष्य करताना अमित ठाकरे म्हणाले की, “पेपरफुटी होणार नाही, यावर आपण कधी काम सुरू करणार? जेन झी हे खूप शार्प आहेत, जेन झी प्रश्नच विचारात नाहीय, त्यांना प्रश्न विचारायला दिलं तर बाहेरचा दरवाजा दाखवतील. सरकारने विकृत परिस्थिती आणून ठेवली आहे.”

दरम्यान, अमित ठाकरे यांच्या तळहातावर त्यांची पत्नी मिताली हिचे नाव लिहिलेले दिसले. त्याबद्दल विचारले असता अमित ठाकरे म्हणाले, “माझी पत्नी नेहमीच माझ्या विचारात असते. बाहेर आल्यावर मला वाटले की नाव काढून घ्यावे म्हणून मेहंदी काढली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही