Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळ (Adulterator) करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी हॉटेल आणि ढाबा चालकांपासून ते मिठाई व दूध विक्रेते आणि अगदी मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे.
राज्यभर वेगाने होत असलेल्या या कारवाईमुळे अनेक विक्रेते धास्तावले आहेत. मुंढे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांची या विभागातून लवकर बदली केली जाऊ नये, अशी ठाम मागणीही नागरिक करत आहेत. दरम्यान, ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टद्वारे तुकाराम मुंढे यांनी पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत.
Tukaram Mundhe warns adulterators
कार्यक्षम आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘एक्स’ (X) वर एक पोस्ट शेअर करून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, जेव्हा एखाद्या पॅकेटवरील माहिती किंवा लेबल दिशाभूल करणारे असते, तेव्हा त्याची किंमत शेवटी ग्राहकालाच मोजावी लागते.
‘एक्सपायरी डेट’ ही केवळ पॅकेजिंगवरची शाई नसते. तर पॅकेटवर नमूद केलेली घटक-सामग्रीची माहिती हे ग्राहकाला दिलेले एक वचन असते. मुंढे यांच्या मते, जेव्हा हे वचन मोडले जाते किंवा त्यात जाणीवपूर्वक फेरफार केले जातात, तेव्हा ती केवळ नियमावलीचे उल्लंघन ठरत नाही, तर ग्राहकाचा विश्वासघातही असतो.
कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात भीती किंवा घबराट पसरवण्यासाठी आम्ही हे नियम तयार करत नाही आहोत. अन्न पदार्थ आणि औषधं विकली जातात ती योग्य आहेत की नाही? त्यातील घटक पदार्थ बरोबर आहेत की नाही. जी वचनं दिली आहेत, ती प्रामाणिकपणे पाळली गेली आहेत की नाही? या सगळ्यांसाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे.
ग्राहक आणि व्यापारी यांच्यात आरोग्यदायी व पारदर्शक वातावरण निर्माण करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे तुकाराम मुंढे यांनी या पोस्टद्वारे अधोरेखित केले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ कराल तर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान, एफडीए (FDA) कडून राज्यातील विविध ठिकाणी अंमलबजावणीची कार्यवाही सुरूच आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय! नागपुरात DJ बंदीचा मोठा आदेश; आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत कठोर निर्बंध
- जरांगेंनी उपोषण सोडावं! ‘मराठा आरक्षणाच्या 90% मागण्या मान्य’, गिरीश महाजनांचा दावा
- राघव चड्ढा यांचं नाव SIR यादीतून वगळलं; ‘आप’ म्हणतं, ‘खासदारकी धोक्यात येऊ शकते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











