Share

राघव चड्ढा यांचं नाव SIR यादीतून वगळलं; ‘आप’ म्हणतं, ‘खासदारकी धोक्यात येऊ शकते’

राघव चड्ढा यांचं पंजाबच्या मतदारयादीतून नाव हटवल्याने SIR वाद पेटला असून ‘आप’ने त्यांच्या खासदारकीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

Published On: 

Raghav Chadha SIR controversy

Raghav Chadha : पंजाबमधील ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेअंतर्गत भाजपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे, ज्यामुळे पंजाब आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. चढ्ढा यांनी पंजाबमधील आप (AAP) सरकारवर राजकीय कट रचल्याचा आरोप केला आहे, तर ‘आप’च्या नेत्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांची खासदारकी (MP Post) धोक्यात असल्याचा दावाही केला आहे.

राघव चढ्ढा यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये दावा केला आहे की, मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान त्यांचे नाव वगळण्यात आले. या प्रकरणासाठी त्यांनी ‘आप’ (AAP) सरकारला जबाबदार धरले आहे. चढ्ढा यांनी नमूद केले की, ते राज्यसभेचे खासदार असून त्यांचे नाव पंजाबमधील मोहाली मतदारसंघातील यादीत असायला हवे होते. मात्र प्रारूप मतदार यादीत ते ‘स्थलांतरित’ (shifted) असल्याचे दर्शवण्यात आले आहे.

Raghav Chadha SIR controversy

चड्ढा यांच्यावरील आरोपांवर ‘आप’नेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये दावा केला आहे की, राघव चड्ढा यांचे राज्यसभा सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याचे कारण भारद्वाज यांनी दिले आहे. दरम्यान, ‘आप’च्या एका पोस्टमध्येही चड्ढा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

‘आप’ने म्हटले आहे की, दिल्लीमध्ये मागील तारखेपासून मतदार नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न चड्डा यांनी केल्याचा आरोप एका इंग्रजी दैनिकाने केला आहे. मतदार यादीतील नावे वगळण्याच्या किंवा समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत पंजाब सरकारची कोणतीही भूमिका नसते. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाद्वारे राबवली जाते. तसेच, अधिकृत नोंदींवरून हे स्पष्ट होते की चड्ढा हे पंजाबमध्ये नव्हे, तर दिल्लीत वास्तव्यास आहेत, असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

चड्ढा हे दिल्लीतील राजिंदर नगर मतदारसंघातील आपली मतदार नोंदणी मागील तारखेची करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारची अनियमितता झाल्याचा आरोप करत ‘आप’ने (AAP) या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, जर भाजप किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारे मागील तारखेची नोंदणी करण्यास मदत केली असेल, तर हे प्रकरण जनतेसमोर आणले जाईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही