तुकाराम मुंढेंना थेट मुख्यमंत्री करा; अमित शाहांकडे पत्र, राज्यात चर्चेला उधाण

तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईनंतर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची मागणी करत मराठी संघटनांनी अमित शाहांकडे पत्र पाठवलं आहे.

Published On: 

Tukaram Mundhe CM Demand 

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe)  हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अनेक धाडसी आणि निर्णायक पावले उचलली आहेत. अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांनी अनेक नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित किंवा रद्द केले आहेत.

त्यांच्या या कठोर कारवाईचा आवाका केवळ अन्नसुरक्षेपुरता मर्यादित न राहता औषध क्षेत्रापर्यंतही विस्तारलेला आहे. या कारवाईनंतर, अन्नातील भेसळ कमी झाली असल्याचे मत सामान्य जनतेने व्यक्त केले आहे. दरम्यान, आता तुकाराम मुंढे यांची थेट राज्याचे ‘मुख्यमंत्री’ (CM) म्हणून नियुक्ती करावी, अशी मोठी मागणी पुढे आली असून, या मागणीबाबतचे एक पत्र थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना सादर करण्यात आले आहे.

Tukaram Mundhe CM Demand 

‘मराठी एकीकरण समिती’ आणि ‘आम्ही गिरगावकर’ या संघटनांच्या वतीने उद्या, ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील हुतात्मा चौक येथे एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाची तयारी आता पूर्ण झाली आहे. प्रत्यक्ष निदर्शने करण्यापूर्वी, तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी करणारे पत्र या दोन्ही संघटनांनी थेट केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पाठवले आहे.

तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत विविध व्यासपीठांवरून मुलाखती दिल्या आहेत. त्यांना अनेकदा राजकारणात येण्याचा विचार आहे का?, असे विचारले आहे. मात्र त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही, तर त्याऐवजी आपण भविष्याबद्दल काहीही सांगू शकत नाही, असे म्हटले आहे. अशा परिस्थितीत, अलीकडेच अमित शहा यांच्याकडे करण्यात आलेली एक मागणी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही