Share

‘मुंबईच नाही, दिल्लीही हलवू शकतो’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांनी अंतरवालीत उपोषण सुरू करत मुंबई आंदोलनाची तारीख 12 तारखेला जाहीर करणार असल्याचे सांगितले.

Published On: 

Manoj Jarange Maratha protest

Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीच्या प्रमाणपत्रांसाठी वंशावळींची पडताळणी करणाऱ्या समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असली, तरीही मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

उपोषण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे मराठा समाजातील मोठ्या संख्येने लोक जमा झाले. उपस्थितांना संबोधित करताना जरांगे यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली आणि आगामी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. येत्या १२ तारखेला मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करतील. तसेच, मुंबईतील हे आंदोलन पाच टप्प्यांत होणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange Maratha protest

“मराठा बांधवांना मुंबईला नेऊन तीन दिवसांत परत आणणे आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे, यावेळी आम्हाला पक्की तयारी करावी लागेल,” असे म्हणत त्यांनी समाजातील बांधवांना या आंदोलनासाठी सुनियोजित पद्धतीने सज्ज होण्याचे आवाहन केले. जरी यंदाचे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने केले जाणार असले, तरी त्याचा परिणाम सरकारला प्रभावीपणे जाणवला पाहिजे. हे शेवटचे आंदोलन असल्याचे सांगत मागण्यांबाबत माघार घेतली जाणार नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

सरकारला इशारा देताना जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उल्लेख केला. सरकारला आपल्या ताकदीची जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे, असेही जरांगे यांनी अधोरेखित केले.

“एकदा प्लॅनिंग झाली तर मुंबईच नाही, दिल्लीसुद्धा हलवू शकतो,” असा इशारा सरकारला देत मराठा समाजापुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असा दावाही जरांगे यांनी केला. यावेळी जरांगे यांनी मोटारसायकली आणि इतर वाहनांसह मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करण्याबाबत चर्चा केली. मात्र, त्याचबरोबर हे आंदोलन शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.

६० वर्षांखालील समाजबांधवांनाही आवाहन

समाजातील ज्येष्ठ नागरिकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. ५० ते ६० वर्षांच्या आतील समाजबांधवांनी मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हावे, तरुण समाजासाठी लढत असताना इतरांनीही समाजाच्या प्रश्नांसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

१२ तारखेला पुढील दिशा ठरणार

मुंबईतील आंदोलनाची तारीख १२ तारखेला जाहीर होणार आहे. त्यानंतर या आंदोलनाचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. तसेच, मुंबईत येणाऱ्या समाजबांधवांसाठी आवश्यक नियोजन आणि तयारी करण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या मागणीबाबत, तसेच जात पडताळणी आणि इतर मुद्द्यांबाबत सरकार काय पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install