Share

मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतरही एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम होणार; परभणीत पोलिसांचा फौजफाटा

परभणीत आज एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र याला मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध करत जोरदार इशारा दिला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil protesting against Eknath Shinde event in Parbhani

Manoj Jarange Patil: परभणीत राजकीय हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आलाय. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा थेट इशारा दिलाय.

आज परभणीत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि युवा संवाद मेळावा पार पडतोय. ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेले खासदार संजय जाधव यांनी याचं आयोजन केलंय. आज अनेक स्थानिक नेते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पण या सगळ्याला मनोज जरांगे यांनी कडाडून विरोध केलाय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि हैदराबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसाठी ते अंतरवली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत.

Manoj Jarange यांचा संजय जाधव यांच्यावर घणाघात

या मेळाव्यावरून जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट खासदार संजय जाधव यांनाच लक्ष केलं. जाधव हा सगळ्यात थर्डक्लास माणूस असल्याचं जरांगे म्हणाले. तुमच्याकडे पाचशे गुंड असतील पण राजकारण गुंडगिरीवर चालत नाही असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून जाधव हे शेतकऱ्यांच्या आडून मराठ्यांच्या उरावर नाचत असल्याचा घणाघात जरांगेंनी केला. आम्ही जीवाचं रान करून तुम्हाला मोठी साथ दिली होती. पण आता तुम्हीच मराठ्यांच्या विरोधात कार्यक्रम घेत आहात. याचे परिणाम नक्की भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.

शिंदेंचं आव्हान स्वीकारलं, मुंबईत परतफेड करू – मनोज जरांगे पाटील

एवढंच नाही तर जरांगेंनी थेट एकनाथ शिंदे यांचं आव्हान स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. याची परतफेड आम्ही मुंबईत करू असा कडक इशारा त्यांनी दिलाय. येत्या १२ तारखेला पुढील दिशा ठरवली जाईल असंही ते म्हणाले.

या वाढत्या तणावामुळे परभणीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी खासदार संजय जाधव यांचं घर गाठून परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्यामुळे आता परभणीत पुढे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install