Share

रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यातच विषय संपवला!

रोहित पवारांची काँग्रेस नेत्यांशी वाढती जवळीक आणि पक्षाच्या बैठकीला मारलेली दांडी, यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे.

Published On: 

Supriya Sule speaking on MLA Rohit Pawar and his closeness with Congress

मुंबई– राष्ट्रवादीत एकीकडे पक्षाच्या विलीनीकरणाच्या वावड्या उठत आहेत. तर दुसरीकडे पक्षाचे युवा नेते थेट काँग्रेस नेत्यांच्या जवळ जाताना दिसत आहेत. नुकतीच मुंबईत शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. पण, या बैठकीला रोहित पवारांनी चक्क दांडी मारली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. रोहित पवारांचा ओढा अचानक काँग्रेसकडे का वाढतोय? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत. याच चर्चेवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

रोहित पवारांच्या नाराजीवर Supriya Sule यांचा मोठा गौप्यस्फोट

खासदार सुप्रिया सुळे म्हणल्या, ‘या वयात थोडा अस्वस्थपणा असतोच, आमच्या पक्षात प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं जातं. एका वयानंतर जबाबदाऱ्या वाढतात, तशी प्रगल्भताही येते, असं सुळे म्हणाल्या. रोहित पवार तरुण आहेत, वयाच्या ४० व्या वर्षी मीदेखील अशीच होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना त्यांनी स्वपक्षीय नेत्यांऐवजी थेट राहुल गांधींना निमंत्रण दिलं. शिवाय, अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या घटनेनंतरही रोहित पवार थेट राहुल गांधींना जाऊन भेटले होते.

एवढंच नाही, तर पंढरपुरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करताना काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ त्यांना भेटायला गेले होते. पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमावेळी रोहित पवारांनीच स्वागताचे बॅनर्स लावले होते. त्यामुळेच रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चांनी जोर धरलाय.”

Rohit Pawar यांना काय सल्ला द्याल?

त्यावर सुळेंनी मिश्किल उत्तर दिलं. “मी कुणालाही सल्ला देत नाही. वडिलांचे काही गुण माझ्यातही यायला हवेत. आयुष्यात सगळंच बोलून दाखवायचं नसतं. थोडं हात राखून खेळायचं असतं,” असं म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install