कर्जमाफी जाहीर झाली, पण तुमच्याही खात्यात दोन लाखांऐवजी कमीच रक्कम जमा झालीये का? सध्या राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात हाच मोठा संभ्रम आहे.
राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान योजने’ची अंमलबजावणी सध्या वेगात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल १६ लाख ९६ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र, कर्जमाफीची (Shetkari Karjmafi) रक्कम अपुरी मिळत असल्याच्या वाढत्या तक्रारींनंतर आता सहकार विभागाने मोठा खुलासा केला असून, ‘एनपीए’ (NPA Accounts) झालेल्या खात्यांसाठीची ‘हेअर कट’ (Haircut Scheme) योजना सविस्तर समजावून सांगितली आहे.
Shetkari Karjmafi
गेल्या काही वर्षांत नवी कर्जमाफी न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची खाती थकीत म्हणजेच ‘एनपीए’ झाली आहेत. अशा शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढण्यासाठी बँकांशी तडजोड करून वन टाईम सेटलमेंट (OTS) केली जात आहे. याच प्रक्रियेला शासनाच्या भाषेत ‘हेअर कट’ योजना म्हटलं जातं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत थकीत कर्जाच्या कालावधीनुसार काही टक्केवारी ठरवून देण्यात आली आहे. तीच रक्कम कर्जमाफीच्या माध्यमातून बँकेत जमा करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जातोय. त्यामुळेच खात्यावर दोन लाखांऐवजी तडजोडीची रक्कम जमा होत आहे.
नेमकी तडजोड कशी होतेय? जर तुमचं कर्ज ३० सप्टेंबर २०२१ किंवा त्यापूर्वीचं असेल, तर एकूण कर्जाच्या फक्त ३५ टक्के रक्कम भरून खातं निरंक करता येईल. दुसरीकडे, १ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ या काळातील कर्जासाठी ४५ टक्के, तर १ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या कर्जासाठी ५५ टक्के रक्कम भरणं अपेक्षित आहे.
त्यापुढील १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या थकीत कर्जासाठी ७० टक्के आणि त्यानंतर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कर्जासाठी ८५ टक्के रक्कम भरून खातं क्लिअर करता येणार आहे. याच टक्केवारीनुसार कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होत असल्याने, ती मूळ आकड्यापेक्षा कमी असू शकते.
व्यावसायिक बँकांमधील थकीत कर्जाबाबतचा गोंधळ दूर करताना सहकार आयुक्तांनी आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली असून, या तारखेनंतरच्या व्याजाचा भुर्दंड थेट बँकाच उचलणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंना मोठा धक्का; एका निर्णयावरून २९ कर्मचाऱ्यांचं थेट मंत्र्यांना पत्र, प्रशासनात मोठी खळबळ
- ‘सूनबाई चहा हवा का कॉफी?’, सूनबाईंची प्रेमाने विचारपूस; सचिनच्या वागण्याने चाहते भारावले
- मोठा ट्विस्ट! गौतम गंभीरची खुर्ची धोक्यात? BCCI कडून व्हीव्हीएस लक्ष्मणला मोठी ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












