मदुराई, 31 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे नेतृत्व कोण करणार यावर नेहमीच अमित शाह, योगी आदित्यनाथ किंवा शिवराजसिंह चौहान यांची नावे आघाडीवर घेतली जातात. मात्र, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी पुढचा पंतप्रधान एखादी तमिळ व्यक्ती असू शकते, असे मोठे संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेकांना धक्का बसला आहे.
तामिळनाडूतील पसुमपोन येथे आलेले उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी मदुराईच्या मीनाक्षी अम्मन मंदिरात पत्रकारांशी संवाद साधला. भविष्यातील पंतप्रधान कोण असेल या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “भविष्यात एखादी तमिळ व्यक्ती देशाची पंतप्रधान होण्याची शक्यता नेहमीच असते. आपल्या देशात प्रत्येकाला ही संधी उपलब्ध असते. त्यामुळे भविष्यात देशाचा पंतप्रधान एखादी तमिळ व्यक्ती होऊ शकते.”
या शक्यतेचे स्पष्टीकरण देताना राधाकृष्णन यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दाखला दिला. कर्नाटकातून आणि आता गुजरातमधून पंतप्रधान देशाला मिळाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तामिळनाडूतून आजवर कोणीही पंतप्रधान पदावर पोहोचलेले नाही, मात्र या राज्याने देशाला तीन राष्ट्रपती आणि तीन उपराष्ट्रपती दिले आहेत. यामध्ये स्वतः राधाकृष्णन यांचाही समावेश आहे. ते १९९८ ते २००४ या काळात कोईम्बतूरचे भाजप खासदार राहिले आहेत.
उपराष्ट्रपतींच्या या विधानानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राधाकृष्णन यांचा रोख जोसेफ विजय यांच्याकडेच होता आणि विजय यांच्यातच पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत केंद्र सरकारच्या परिसीमन विधेयकाला विरोध करणारा प्रस्ताव मांडला होता. या चर्चेदरम्यान टीव्हीकेचे महासचिव आणि बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी राजकीय सत्ता केवळ उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातपुरती मर्यादित नसून, दक्षिण भारतातील तामिळनाडूतूनही पंतप्रधान झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. त्यातून त्यांनी विजय हेच पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचे सुचवले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘रोहित पवार लबाड लांडगा, राजकारणातला कलंक’, भाजप आमदारांची सडकून टीका
- हार्दिक पांड्याची खुर्ची धोक्यात; आयपीएल २०२७ साठी रोहित शर्मा आणि तिलक वर्मा कर्णधारपदाच्या शर्यतीत
- ठाकरेंसोबत बंद दाराआड काय चर्चा झाली? देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








