भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी तिने थेट आपल्याच पक्षाला, म्हणजेच भाजपला (BJP) धक्का देणारं एक मोठं विधान केलं आहे.
‘मी काही भाजपची कठपुतळी नाहीये. उद्या पक्ष माझ्या पाठीशी उभा राहील की नाही, हे मला माहिती नाही’, असं अत्यंत रोखठोक मत कंगनाने मांडलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत तिने ही धक्कादायक भूमिका स्पष्ट केली.
Kangana Ranaut News
तुमची विधाने ही पक्षाची अधिकृत भूमिका असते का? या प्रश्नावर कंगना आक्रमक झाली. ती म्हणाली की, जेव्हा आजूबाजूला गदारोळ असतो, तेव्हा ओरडून बोलावं लागतं. मी जाणूनबुजून असं करत नाही. पण मी काही ‘पपेट’ नाही. भाजप आज माझ्यासोबत आहे, उद्या नसेलही. मी २० वर्षांपासून एक कलाकार आहे आणि माझं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे.
थोडक्यात सांगायचं तर, तिने आपली विचारधारा वैयक्तिक असल्याचं ठणकावून सांगितलंय. पुढच्या वेळी लोकसभेचं तिकीट मिळालं नाही तर? यावर कंगना म्हणाली की, त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. तिकीट नाही मिळालं तर माझं अस्तित्व संपणार नाही. मी आजही अनेक मोठ्या दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री आहे. माझ्या आयुष्यात करण्यासारखं बरंच काही आहे. तसेच नाव न घेता ‘कॉकरोचची पप्पी तर घेणार नाही ना?’ असा खोचक टोलाही तिने लगावला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘तुका’ म्हणे चायनीज ऐसेची खावे..’; तुकाराम मुंढे यांची कारवाई आणि केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले….
- ‘सुळेंचं माहिती नाही, रोहित पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे’; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा
- गणेशोत्सवातील महाप्रसादावर FDA ची नजर? तुकाराम मुंढेंनी थेटच सांगितला प्लॅन!
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









