Share

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ! अमेरिका-इराण संघर्षाचा थेट परिणाम

अमेरिका-इराणमधील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होत असून, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,289 रुपये प्रति तोळ्यावर आला आहे.

Published On: 

Gold Rate

🕒 1 min read

Gold Price : अमेरिका (US) आणि इराण (Iran) यांच्यातील संघर्षामुळे सोन्याचे (Gold Rate) भाव घसरत होते. मात्र, दोन्ही देशांमधील शांतता करारामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. यापूर्वी, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे सोने आणि चांदीच्या भावात (Silver Rate) मोठी घसरण झाली होती. अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्याने सोने आणि चांदीच्या (Gold and Silver) दरांवर परिणाम होऊन ते खाली आले होते. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात ४,००० रुपयांची, तर चांदीच्या भावात १६,००० रुपयांची घसरण झाली.

जळगावमधील सराफा (Jalgaon Sarafa Bazar) व्यापाऱ्यांच्या मते, सोने आणि चांदीच्या भावातील या चढ-उतारांचे कारण युद्धसदृश परिस्थिती हे आहे. सोन्याचे भाव ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) परिसरातील घडामोडींवर अवलंबून आहेत. व्यापारी आकाश भांगले यांनी सांगितले की, जर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष लवकर संपला, तर तेलाचे भाव कमी होतील आणि सोने-चांदीचे भाव वाढतील. जर हा संघर्ष कायम राहिला, तर सोने आणि चांदीच्या भावांवरील दबाव कायम राहण्याची आणि त्यामुळे आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. संघर्ष संपल्यानंतर सोन्याचे भाव वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

जळगावमध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा १,४२,००० रुपये आहे, तर चांदीचा भाव प्रति किलो २,२२,००० रुपये आहे. युद्धसदृश परिस्थितीमुळे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. चीनने गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती.

२०२५ ते २०२६ या काळात सोन्याचे भाव १,३०,००० ते १,८०,००० रुपयांच्या दरम्यान होते. सध्या लग्नसराईचा हंगाम नसतानाही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. IBJA च्या दरांनुसार, २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,४३,३६८ रुपये होता; आज त्यात १,०७९ रुपयांची घसरण होऊन तो १,४२,२८९ रुपयांवर आला आहे. त्यानुसार, २२-कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याचा दर १,३०,३३७ रुपये आहे. चांदीचा प्रति किलो दर २,१७,२३५ रुपये आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही