Share

नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नितीन गडकरींसमोर केलेल्या ‘त्या’ एका विधानाने उडाली खळबळ!

नागपूरमधील जलक्रांती परिषदेत अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘महाराष्ट्र सोडण्याचा’ विचार बोलून दाखवला. त्यांच्या या भावनिक विधानाने सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

Published On: 

Nana Patekar Speech: नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार?

माणसाच्या मनात कधी काय विचार येईल, हे कुणीच सांगू शकत नाही. पण जेव्हा हा माणूस नाना पाटेकर (Nana Patekar) असतो, तेव्हा त्यांचे शब्द थेट काळजाला भिडतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय.

नुकतंच नागपुरात असं काही घडलंय, ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जलक्रांती परिषदेत अभिनेते नाना पाटेकर यांनी चक्क ‘महाराष्ट्र सोडण्याचा’ विचार बोलून दाखवला आणि राजकीय वर्तुळासह चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

Nana Patekar Speech

मंचावरून भाषण करताना नाना अचानक म्हणाले, “मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो.” हे वाक्य ऐकताच क्षणभर उपस्थितांचा श्वास रोखला गेला. पण यामागे कोणतीही राजकीय नाराजी नव्हती. तर डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची ती तळमळ होती.

शहरातल्या सिमेंटच्या जंगलात नानांचा जीव गुदमरतोय. “शहरातल्या भिंती मला आता कबरीसारख्या वाटू लागल्या आहेत,” अशी भावनिक साद घालत त्यांनी आपलं मन गाई, कुत्रे आणि शेतात रमत असल्याचं स्पष्ट केलं. डोंगर-खेड्यात जाऊन तिथेच आपले चार खांदे शोधावेत, अशी अस्वस्थ करणारी इच्छा त्यांनी नागपुरात व्यक्त केली.

यावेळी त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या सुरुवातीच्या दिवसांचा किस्सा सांगितला. माणसाचं काही कर्तव्य असतं या भावनेतून स्वतःचे दीड कोटी रुपये टाकून त्यांनी कामाला सुरुवात केली. पण पुढे अवघ्या ३ महिन्यांत जनतेने ६० कोटी रुपयांची घसघशीत मदत उभी केली, याचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्राच्या दातृत्वाला सलाम केला.

राजकारणावरही त्यांनी परखड मत मांडलं. “सरकार कोणाचंही असो, भाजप की काँग्रेस, आपण सामाजिक प्रश्नांवर एकच आहोत,” असं म्हणत त्यांनी स्वामिनाथन आयोगाची अद्याप पूर्ण अंमलबजावणी न झाल्याची खंत बोलून दाखवली. तात्पुरते हेवेदावे विसरून आता गावाची ओढ धरा, असा थेट संदेश नानांनी दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही