Share

जुन्या गाड्यांमध्ये E-20 पेट्रोल टाकताय? नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी कबुली; ‘या’ वाहनांचे होणार नुकसान

E-20 पेट्रोलमुळे जुन्या बीएस-३ वाहनांच्या रबरी भागांचे नुकसान होऊ शकते, अशी मोठी कबुली खुद्द नितीन गडकरींनी राज्यसभेत दिली आहे. यामुळे गाडीचा देखभाल खर्च वाढू शकतो.

Published On: 

E-20 Petrol effect on old BS3 vehicles at fuel pump

दिल्ली– तुमच्याकडे जुनी कार किंवा बाईक आहे का? आणि तुम्ही त्यात नवं E-20 पेट्रोल टाकत असाल, तर ही बातमी नक्की वाचा. कारण, या नव्या पेट्रोलमुळे तुमच्या गाडीचं नुकसान होऊ शकतं. धक्का बसला ना? पण हे अगदी खरंय. आणि विशेष म्हणजे, खुद्द केंद्र सरकारने पहिल्यांदाच ही गोष्ट जाहीरपणे मान्य केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी थेट राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही महत्त्वाची माहिती दिली. एका लेखी उत्तरात त्यांनी स्पष्ट केलं की, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल (E-20 Petrol) मिसळल्याने जुन्या वाहनांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. विशेषतः १ एप्रिल २००५ ते २०१६ या काळात बनवलेल्या आणि बीएस-३ (BS-3) मानकांमध्ये मोडणाऱ्या गाड्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

E-20 Petrol Impact: जुन्या वाहनांमधील ‘हे’ भाग बदलावे लागणार

थोडक्यात सांगायचं तर, यामुळे गाडीच्या संपूर्ण इंजिनला थेट धोका नाही. इंजिनमध्ये कोणतेही मोठे बदल करण्याची अजिबात गरज नाही. पण, फ्युएल सिस्टीममधील जुने रबरी भाग मात्र खराब होऊ शकतात. पेट्रोलमधील इथेनॉलमुळे हे रबरी भाग कालांतराने कडक होतात, मऊ पडतात किंवा फुगतात. त्यामुळे फ्युएल पाईप्स, ओ-रिंग्ज, रबर सील्स, गॅस्केट्स, फ्युएल पंपाचे घटक आणि इंजेक्टर सील्स सारखे भाग नियमित सर्व्हिसिंगच्या वेळी बदलण्याची वेळ येऊ शकते. युरो-४ पेक्षा कमी मानकांच्या वाहनांच्या धातूच्या भागांवरही थोडाफार परिणाम होऊ शकतो.

दुसरीकडे, गाडीच्या देखभालीचा खर्च आता थोडा वाढू शकतो. अधिकृत सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, हा भाग बदलण्याचा खर्च वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असेल. मर्सिडीज-बेंझसारख्या महागड्या गाड्यांसाठी हा खर्च जास्त असेल, तर मारुतीसारख्या गाड्यांसाठी तो कमी असू शकतो. साधारणपणे दुचाकीसाठी ५०० ते १५०० रुपये, तर चारचाकीसाठी २ ते ८ हजार रुपयांपर्यंतचा खर्च असू शकतो.

गाडीचं मायलेज फक्त इंधनावर ठरत नाही. तुमची ड्रायव्हिंग स्टाईल कशी आहे, रस्ते कसे आहेत आणि गाडीची देखभाल कशी होते, यावरही ते अवलंबून असतं, असं गडकरींनी स्पष्ट केलं. इंडियन ऑइल, SIAM आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासातून हे समोर आलंय. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, गाडी चालू राहिल्यास अडचण नाही, फक्त नेहमीच्या देखभालीवर थोडं जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही