Share

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा भूकंप; भाजपसह एमआयएमच्या २३ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांचा समावेश असून त्यांची खुर्ची धोक्यात आली आहे.

Published On: 

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation building bjp corporators disqualification issue

BJP corporators: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे चित्र दिसतंय. एकाच वेळी तब्बल २३ नगरसेवकांची खुर्ची धोक्यात आली आहे. महापालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या या एकाच बातमीने मोठी खळबळ उडवून दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) तब्बल २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात सत्ताधारी भाजपचे (BJP) ७ तर विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचे (MIM) तब्बल १६ नगरसेवक रडारवर आहेत. त्यामुळे अनेकांचं धाबं दणाणलं आहे.

BJP corporators Chhatrapati Sambhajinagar

एवढी मोठी कारवाई अचानक कशी? तर, गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी थेट महाराष्ट्र महापालिका अधिनियमाखाली या नगरसेवकांविरोधात तक्रारी ठोकल्या होत्या. बेकायदा बांधकाम, शहरात केलेलं अतिक्रमण आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये, या गंभीर मुद्द्यांवरून ही मोठी कारवाई सुरू झाली आहे.

थोडक्यात सांगायचं तर, प्रशासनाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे. नगर सचिव, जन्म-मृत्यू नोंदणी आणि अतिक्रमण विभागाने या सर्व २३ नगरसेवकांना आपली बाजू मांडण्याची संधी दिलीय. आता येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात यावर अंतिम सुनावणी पार पडणार आहे.

दुसरीकडे, प्रशासनाने याप्रकरणी थेट इशारा दिलाय. सुनावणीला आवश्यक कागदपत्रांसह हजर न राहिल्यास किंवा समाधानकारक उत्तर न दिल्यास एकतर्फी निर्णय घेतला जाईल. जर हे नगरसेवक अपात्र ठरले, तर महापालिकेतील संख्याबळ आणि सत्तासमीकरणं पूर्णपणे बदलतील. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या सुनावणीकडे लागल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही