Share

IMD Weather Update: ऑगस्टमध्ये पावसाची दडी की मुसळधार? विदर्भ-मराठवाड्यासाठी सर्वात मोठी बातमी

हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे, साताऱ्यात मुसळधार पावसामुळे धोम धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे.

Published On: 

IMD weather update | IMD Rain Forecast

IMD Rain Forecast: ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असेल, याच्या विचारात आहात का? जुलै महिन्याने तर राज्याच्या अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढलंय. आता हवामान खात्याची (IMD) पावसाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. एका बाजूला साताऱ्यात पुराचं संकट उभं राहिलंय, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ही एक दिलासादायक बातमी ठरू शकते.

ऑगस्ट महिन्यात देशासह राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पण, याच ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसं झाल्यास इथल्या बळीराजाची मोठी चिंता मिटणार आहे. आकडेवारीच बघायची झाली तर, जुलैअखेर विदर्भात सरासरीच्या ९५ टक्के, तर मराठवाड्यात ९२ टक्के पाऊस झालाय. दुसरीकडे कोकणात पावसाने १०१ टक्क्यांसह सरासरी गाठली आहे, तर मध्य महाराष्ट्राने १२५ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे.

पावसाच्या या लपंडावात साताऱ्याची स्थिती मात्र भयंकर झाली आहे. वाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने थेट रौद्ररूप धारण केलंय. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोम धरण सध्या ८९ टक्के भरलं असून, तिथून कृष्णा नदीपात्रात तब्बल ४,९६६ क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

यामुळेच वाईच्या ऐतिहासिक महागणपती मंदिराला थेट पुराच्या पाण्याने वेढा घातलाय. अगदी गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचलं आहे. शहरातील कृष्णा घाटासह सर्व घाट पाण्याखाली गेले आहेत. पुलांवरूनही पाणी वाहत असल्याने नागरिकांनी जीव मुठीत धरून प्रवास करू नये आणि नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दुसरीकडे, या पावसाळी वातावरणात मच्छीमारांसाठीही एक मोठी बातमी आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आजपासून मासेमारी सुरू झाली आहे. पण, महाराष्ट्रातील मच्छीमारांना १५ ऑगस्टपर्यंत किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांच्या आत मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे. त्यांना केवळ १२ मैलांपलीकडील राष्ट्रीय सागरी क्षेत्रातच मासेमारी करता येईल. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर मासेमारी होणार नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्य विभागाची गस्ती नौका खरंच सज्ज आहे का? असा सवाल आता पारंपरिक मच्छीमार विचारत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही