Share

राज्यात पावसाचा हाहाकार! IMD ने दिला मोठा इशारा, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा सल्ला

राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून IMD ने महाराष्ट्रासह देशातील 18 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा जारी केला आहे.

Published On: 

Weather

Weather Update: दीर्घकाळ पावसाविना गेल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसामुळे नाशिक आणि राज्यातील इतर भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पावसाबाबत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. ओराई, सीधी आणि रांची या भागांवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सातारा, रायगड आणि रत्नागिरीच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, कोल्हापूरचे घाट आणि गडचिरोली येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही आज पावसाची शक्यता असून, बहुतांश जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत सातत्याने पडत राहिला. आगामी काही दिवसांत राज्यभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. देशभरात मान्सून अधिक सक्रिय होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आणखी एक महत्त्वाची चेतावणी जारी केली असून, पुढील १२ तासांत १८ राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

ताज्या अंदाजानुसार, २७ जुलै रोजी उत्तर भारतापासून पूर्व आणि मध्य भारतापर्यंतच्या अनेक राज्यांमध्ये हवामानाची स्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये आधीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या काळात अनेक भागांत वाऱ्याचा वेग ताशी ८० किमीपर्यंत पोहोचू शकतो. हवामान विभागाने काही भागांत गारपिटीची शक्यताही वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ जुलै रोजी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या १८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आगामी काही तास महत्त्वाचे ठरणार असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही