Share

अंकिता लोखंडेने स्वतःच्या हाताने उचललं शेण; ३० कोटींची संपत्ती असतानाही केलं असं काम की सर्वच झाले थक्क!

प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने बेंगळुरू येथील गोशाळेत चक्क स्वतःच्या हाताने शेण साफ केले. तिचा हा साधेपणा पाहून चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

Published On: 

Ankita Lokhande Video: अंकिताने गोशाळेत उचललं शेण!

🕒 1 min read

बॉलिवूड किंवा टीव्ही सेलिब्रिटी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो लखलखाट आणि आलिशान जीवनशैली. पण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने चक्क स्वतःच्या हाताने गाईचं शेण उचललं आहे, यावर तुमचा विश्वास बसेल का?

होय, हे खरं आहे. टीव्हीची लोकप्रिय सून अर्थात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विक्की जैन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘Laughter Chefs 3’ या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ही जोडी नुकतीच बेंगळुरूमध्ये पोहोचली. तिथे त्यांनी आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमातील गोशाळेला भेट दिली.

Ankita Lokhande Video

यावेळी त्यांनी फक्त दर्शन घेतलं नाही, तर चक्क गोसेवा केली. अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर या भेटीचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ३० कोटींची मालकीण असलेली अंकिता कोणत्याही संकोचाशिवाय स्वतःच्या हातांनी गोशाळेतील शेण साफ करताना दिसत आहे.

तिच्या चेहऱ्यावर लाज किंवा कंटाळा अजिबात नव्हता. उलट ती अतिशय आनंदाने गाईंना चारा भरवताना आणि साफसफाई करताना पाहायला मिळाली. नेहमी ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या Ankita Lokhande चा हा साधेपणा सध्या चाहत्यांची मनं जिंकत आहे. एरवी सेलिब्रिटींचा दिखावा पाहण्याची सवय असलेल्या नेटकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने एक सुखद धक्का होता.

सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. खऱ्या अर्थाने संस्कार जपणारी अभिनेत्री अशा कमेंट्स करत चाहते या जोडप्याचं भरभरून कौतुक करत आहेत. सेलिब्रिटी असूनही जमिनीवर पाय ठेवून जगण्याची ही पद्धत अनेकांना भावली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!