माझ्यासाठी हाच खरा रेड कार्पेट………कोकण हार्टेड गर्लची अशोक सराफांबद्दल भावुक पोस्ट

कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याबद्दल एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Published On: 

Kokan Hearted Girl: अशोक सराफांबद्दल भावुक पोस्ट!

तुम्हाला वाटत असेल की कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हणजे फक्त ग्लॅमर, फॅशन आणि रेड कार्पेट. पण यंदा तिथे असं काही घडलंय, ज्याने थेट महाराष्ट्राच्या काळजाला हात घातलाय!

नुकतंच फ्रान्समध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘Cannes Film Festival’ मध्ये यंदा मराठी पाऊल दमदारपणे पडलं. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे अशा अनेक कलाकारांनी तिथे हजेरी लावली होती. पण सध्या संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) अंकिताच्या एका अतिशय भावुक इन्स्टाग्राम पोस्टची.

Kokan Hearted Girl

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कान्स महोत्सवाचे काही खास फोटो आणि अनुभव शेअर केले आहेत. पण तिने या पोस्टमध्ये तिथल्या झगमगाटापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीला सर्वाधिक महत्त्व दिलंय. “माझे मागचे ६ दिवस अशोक सर आणि निवेदिता मॅम यांच्यासोबत गेले, एकत्र जेवण, मस्ती… हाच माझ्यासाठी खरा रेड कार्पेट होता,” असं अंकिताने अत्यंत अभिमानाने लिहिलंय. वयाच्या ७८ व्या वर्षी कान्समध्ये पदार्पण करणाऱ्या अशोकमामांसोबत इतका वेळ घालवता येणं, हे तिने स्वतःचं मोठं भाग्य मानलं आहे.

या पोस्टमध्ये तिने अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं अक्षरशः तोंडभरून कौतुक केलंय. एक उत्तम समजूतदार साथीदार कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाल्याचं अंकिता म्हणाली. “रेड कार्पेटवर चालताना अशोक सराफांचा पाय कुठे अडखळू नये, यासाठी निवेदिता मॅम त्यांचा हात घट्ट पकडून होत्या,” हा प्रसंग शेअर करत अंकिताने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. मोठेपणा प्रसिद्धीत नसून आपल्या माणसांना जपण्यात असतो, हा मोलाचा संदेश तिने यातून दिलाय.

रविवारी १७ मे रोजी झालेल्या या ऐतिहासिक रेड कार्पेट वॉकदरम्यान या मराठी प्रतिनिधी मंडळाने आपला मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या पारंपरिक आणि रुबाबदार लूकने तर इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. आता अंकिताच्या या नव्या खुलाशामुळे या दिग्गज जोडप्यामधील प्रेमाची आणि काळजीची चर्चा सगळीकडे रंगली असून, चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही