Share

महाराष्ट्रात उन्हाचा तांडव; २४ तासांत तब्बल ११ जणांचा बळी, नेमकं काय घडतंय?

राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अमरावती आणि जळगावमध्ये अवघ्या २४ तासांत ११ जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा कहर, ११ जणांचा मृत्यू!

घरातून बाहेर पडायचा विचार करताय? जरा थांबा! कारण सध्या महाराष्ट्रात सूर्याने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली आहे. विदर्भ आणि खान्देशात तर उन्हाचा हाहाकार (Maharashtra Heatwave) उडालाय.

परिस्थिती इतकी भयानक आहे की, गेल्या २४ तासांत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Heatwave

अमरावती शहरात तर उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय. इथे एकाच दिवसात ७ जणांनी जीव गमावला आहे. यापैकी दोन मृत्यू अधिकृतपणे ‘Heatstroke’ (उष्माघात) मुळे झाल्याची नोंद रुग्णालयात झाली आहे. उर्वरित ५ जणांचा मृत्यूही तीव्र उष्णतेमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. उन्हाच्या या कहरात प्रामुख्याने रस्त्यावरील बेघर आणि वृद्ध व्यक्ती बळी पडत आहेत.

हवामान विभागाने (IMD) अमरावती आणि अकोल्यात रेड अलर्ट दिलाय. अमरावतीच्या ओल्ड कॉटन मार्केट परिसरात काही बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. तीव्र उन्हात सावली न मिळणे आणि शरीरातील पाणी अचानक कमी झाल्याने हे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तिकडे जळगावातही परिस्थिती काही वेगळी नाही. चिंचोलीत भर उन्हात काम करणाऱ्या ५७ वर्षीय सेंट्रिंग कामगाराचा चक्कर येऊन जागीच मृत्यू झाला. याशिवाय जिल्ह्यात आणखी तीन तरुणांना उष्माघात सदृश्य लक्षणं (उलटी, चक्कर) आल्याने आपला जीव गमवावा लागला आहे.

या वाढत्या Maharashtra Heatwave च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय. सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आले आहेत. अत्यंत महत्त्वाची कामं असल्याशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडू नका, असं थेट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install