Share

Ladki Bahin Yojana : जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक! १ लाख महिलांचे पैसे अडकले?

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने जळगावात १ लाखाहून अधिक महिलांचे हाल. संतप्त महिलांनी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर.

Published On: 

Ladki Bahin Yojana Update: पैसे अडकले? जळगावात महिलांचा उद्रेक!

ज्या योजनेने महायुतीला महाराष्ट्रात पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसवलं, तीच योजना आता सरकारच्या अंगाशी येतेय की काय? असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, लाडक्या बहिणींचा संयम आता सुटला असून राज्याच्या विविध भागांत संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय. भंडारा, बुलढाणा आणि वाशिमनंतर आता जळगावात (Jalgaon) महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जळगावात आज लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) चांगलंच वातावरण तापलं. खात्यात १५०० रुपये जमा होत नसल्याने शेकडो संतप्त महिलांनी थेट महिला आणि बालविकास केंद्रात धडक दिली. ‘आमचे पैसे लवकरात लवकर द्या’ अशी मागणी करत या महिलांनी प्रशासनाला धारेवर धरलं. फक्त जळगावच नाही, तर विदर्भातही हे लोण पसरलं असून योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर बोट ठेवलं जात आहे.

Ladki Bahin Yojana Update

जळगाव जिल्ह्यात तब्बल १० लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, केवायसी (KYC) पूर्ण करूनही १ लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात छदामही आलेला नाही. आज झालेल्या उद्रेकाचं हेच मुख्य कारण आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवायसी करताना झालेल्या तांत्रिक चुकांमुळे (Technical Errors) हे पैसे अडकले आहेत. पण प्रश्न असा आहे की, याची शिक्षा सामान्य महिलांनी का भोगायची?

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तक्रारींसाठी ‘१८१’ (Helpline 181) हा क्रमांक जाहीर केला होता. मात्र, “फोन करतोय पण कुणी उचलत नाही किंवा लागत नाही,” अशा तक्रारी महिला करत आहेत. दुसरीकडे, वाशिममध्ये परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. तिथे १८ आणि १९ जानेवारीला सलग दोन दिवस महिलांनी संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी भेटत नसल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी गाडीलाच घेराव घातला होता.

सध्या चुकीचे पर्याय निवडलेल्या अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे, असं प्रशासन सांगतंय. पण, हा असंतोष वेळीच शांत झाला नाही, तर सरकारपुढील अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install