Share

लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये जमा, पण ९२ लाख महिला वगळल्याने मोठा गौप्यस्फोट

लाडकी बहीण योजनेचे जुलैचे १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र ई-केवायसीमुळे ९२ लाख महिला वगळल्याने आणि ९६०५ कोटींच्या वाटपावरून मोठा वाद सुरू झाला आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana July Installment Update and Jayant Patil Allegations

Ladki Bahin Yojana: तुमच्याही खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत का? बँक खातं तपासलं का? कारण जुलै महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तब्बल ९२ लाख महिला या योजनेतून अचानक बाहेर फेकल्या गेल्या आहेत. याच मुद्द्यावरून आता राजकारण तापलंय.

सध्या महिला आणि बालविकास विभागाने जुलैचे पैसे वाटप सुरू केले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तो थेट महिलांच्या बँक खात्यात पाठवला जात आहे. रक्षाबंधनापूर्वीच ही रक्कम आल्याने अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला. महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये ही योजना आणली होती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठं यशही मिळालं. पण दुसरीकडे, विरोधकांनी आता एका नव्या दाव्यावरून सरकारला घेरलं आहे.

Ladki Bahin Yojana | ९२ लाख अपात्र लाभार्थी

सुरुवातीला या योजनेत तब्बल २ कोटी ४७ लाख महिलांची नोंदणी होती. पण राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. आणि तिथेच खरं चित्र समोर आलं. तब्बल ६२ लाख महिलांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलीच नाही. त्यामुळे त्यांची नावं आपोआप वगळण्यात आली. इतर काही तांत्रिक कारणांमुळे आणखी लाभार्थी कमी झाले. आता फक्त १ कोटी ६५ लाख पात्र महिलाच उरल्या आहेत.

माहिती अधिकारातून उघड झालेल्या या माहितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केलेत. जून २०२६ पर्यंत तब्बल ९२ लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ९६०५ कोटी रुपये वाटले गेल्याचा दावा त्यांनी केलाय. ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे.

प्रशासन तोपर्यंत झोपलं होतं का?

असा थेट सवाल पाटील यांनी विचारला आहे. ई-केवायसी न करणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी कर्मचारी असणे किंवा एकाच कुटुंबातून अनेक अर्ज येणे. अशी अपात्रतेची कारणे असतानाही पैसे वाटले गेले. योजना लागू करण्यापूर्वी छाननी का झाली नाही? अपात्र लोकांना सरसकट हप्ते दिलेच कसे? त्यामुळेच आता या हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न निर्माण झालाय. लाडक्या बहिणींच्या नावाखाली पैशाचा अपहार झालाय का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. याबाबत आता सरकार काय पावलं उचलतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही