MPSC FDA Paper Leak: एमपीएससीने नुकतीच अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील ‘औषध निरीक्षक’ पदाची भरती रद्द केली. पेपरफुटीमुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. पण हा पेपर फक्त एकाच विद्यार्थ्याकडे फुटला, हे आयोगाचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांनी थेट फेटाळून लावलंय.
रोहित पवारांनी एक्सवर (X) पोस्ट करत आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलंय. राज्यभरात पसरलेल्या एजंटांच्या रॅकेटमार्फत तब्बल ४०-४० लाखांना हा पेपर विकला गेलाय. हीच खरी वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही या काळ्या बाजाराची पूर्ण कल्पना असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
प्रकरण दाबू नका! असा स्पष्ट इशाराच पवारांनी दिलाय. पोलिसांचा चौकशी अहवाल तातडीने सार्वजनिक करा. आम्ही ज्या एजंटांची नावे दिली, त्यांचं पुढे काय झालं? यात आयोगातील कुणाचा हात आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? असा सडेतोड सवाल त्यांनी विचारले आहेत. आयोगाने जर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, तर गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही मागणी आता जोर धरू लागलीये. सरकारने आता स्वच्छ प्रतिमेचा अध्यक्ष नेमावा. तसेच सामान्य प्रशासन मंत्र्यांनी स्वतःहून पुढे येत सत्य जनतेसमोर मांडावं, असंही पवारांनी ठणकावून सांगितलंय. फेरपरीक्षेचा निर्णय झाला असला, तरी या रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचं मोठं आव्हान आता यंत्रणांसमोर आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बाहेर जेवायला जाताय? तुकाराम मुंढेंनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी नक्की तपासा
- पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!
- तिरंगा गाऊनवरून देशात खळबळ, राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपांवर उर्वशी रौतेलाचं थेट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











