Share

14 चेंडूत 50! न्यूझीलंडला फोडूनही युवराजने अभिषेकला ‘का’ डिवचलं? म्हणाला, ‘अजूनही तुला…’

अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकत विक्रम केला, पण मेंटॉर युवराज सिंगने त्याला खास शैलीत डिवचलं आहे. वाचा सविस्तर…

Published On: 

Abhishek Sharma Record: 14 चेंडूत 50! युवराज सिंगची 'ती' पोस्ट व्हायरल

🕒 1 min read

गुरुचा विक्रम मोडायचा असेल तर शिष्याला अजून खूप घाम गाळावा लागणार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय… निमित्त ठरलाय तो भारताचा युवा स्टार अभिषेक शर्मा! न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेकने (Abhishek Sharma) गोलंदाजांची अशी काही पिसं काढली की बघणाऱ्यांचे डोळे विस्फारले. पण या कामगिरीनंतरही त्याचा मेंटॉर युवराज सिंगने त्याला सोशल मीडियावर खास शैलीत ‘डिवचलं’ आहे.

मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस अभिषेक शर्माने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकत इतिहास रचला. भारतीय सलामीवीर म्हणून टी-20 मध्ये हे ‘Fastest Fifty’ ठरले आहे. विशेष म्हणजे अभिषेकने आपल्या 20 चेंडूंच्या खेळीत (नाबाद 68 धावा) एकही ‘Dot Ball’ खेळला नाही. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत 7 चौकार आणि 5 षटकार लगावले.

Abhishek Sharma Record

एवढी भयानक बॅटिंग करूनही अभिषेकला युवराज सिंगचा (12 चेंडूत 50 धावांचा) जागतिक विक्रम मोडता आला नाही. तो फक्त 2 चेंडूंनी हुकला. यावर युवीने मजेत ट्विट करत विचारलं, “अजूनही 12 चेंडूत 50 धावा करू शकत नाहीस का?” यावर अभिषेकनेही मनाचा मोठेपणा दाखवत रिप्लाय दिला की, “युवी पाजीचा रेकॉर्ड मोडणं कोणासाठीही अशक्य आहे, पण प्रयत्न करण्यात एक वेगळीच मजा आहे.” सध्या हे सोशल वॉर चाहत्यांमध्ये चांगलच गाजतंय.

भारताने 154 धावांचे टार्गेट केवळ 10 षटकांतच पूर्ण केले. कॅप्टन सूर्यकुमार यादवनेही (26 चेंडूत 57*) अभिषेकला उत्तम साथ दिली. भारताने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली असून, मायदेशात सलग 11 वी टी-20 सीरीज जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता बुधवारी विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या सामन्यात काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या