इकडे ‘बॉर्डर 2’ सुसाट, तिकडे वरुण अडचणीत; मुंबई मेट्रोतली ‘ती’ मस्ती पडली महागात!

‘बॉर्डर 2’ च्या यशात असतानाच वरुण धवनने मुंबई मेट्रोत केलेल्या स्टंटमुळे वाद निर्माण झाला आहे. मेट्रो प्रशासनाने त्याला कडक शब्दांत समज दिली आहे.

Published On: 

Varun Dhawan Metro Stunt: मुंबई मेट्रोने वरुणला सुनावले खडेबोल!

सिनेमा सुपरहिट झाला की कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा होतो, पण हाच अतिउत्साह कधी कधी अंगलट येऊ शकतो, याचा प्रत्यय सध्या वरुण धवन (Varun Dhawan) ला येतोय. २३ जानेवारीला रिलीज झालेला ‘बॉर्डर 2’ (Border 2) बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दणका उडवतोय. सिनेमाने आतापर्यंत १४० कोटींचा टप्पा पार केलाय. पण या यशाच्या धुंदीत वरुणने मुंबई मेट्रोमध्ये असं काही केलं की, थेट प्रशासनालाच त्याला कायद्याचा धडा शिकवावा लागला आहे.

मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळून वरुणने मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण प्रवासादरम्यान त्याने मेट्रोच्या हँडलला लटकून चक्क पुल-अप्स काढायला सुरुवात केली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या हँडल्सचा असा ‘जिम’सारखा वापर केल्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं.

Varun Dhawan Metro Stunt

मुंबई मेट्रो (MMMOCL) प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी वरुणचा व्हिडिओ शेअर करत त्याला खोचक शब्दांत सुनावले आहे. “तुझ्या सिनेमातल्या ॲक्शनप्रमाणे इथेही एखादं ‘डिस्क्लेमर’ लावायला हवं होतं. मेट्रोचे हँडल्स सुरक्षेसाठी आहेत, लटकण्यासाठी नाहीत,” अशा शब्दांत मेट्रोने त्याला समज दिली आहे.

इतकेच नव्हे, तर हे कृत्य Metro Railways Act, 2002 अंतर्गत गुन्हा ठरू शकतं, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्यास दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे ‘बॉर्डर 2’ मध्ये सनी देओल आणि दिलजीत दोसांझसोबत सीमेवर लढणारा वरुण, खऱ्या आयुष्यात मात्र मेट्रोच्या नियमांच्या कचाट्यात सापडला आहे. सेलिब्रिटी असूनही नियम मोडल्याने वरुणवर सध्या टीकेची झोड उठली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही