Share

T20 World Cup 2026 : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान बांगलादेशसाठी ‘असं’ काही करण्याच्या तयारीत; ICC चे नियम काय?

T20 World Cup 2026 मध्ये पाकिस्तानचा संघ बांगलादेशच्या समर्थनार्थ काळी पट्टी बांधून खेळण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ICC कारवाई करू शकते.

Published On: 

T20 World Cup 2026: पाकिस्तानची 'नापाक' चाल? ICC कडक कारवाईच्या तयारीत

पाकिस्तान आणि वाद हे जणू जुनं समीकरणच झालंय. २०२६ चा टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup 2026) तोंडावर आला असतानाच पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन ‘नाट्य’ सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. खेळाचे नियम सोडून राजकारण कसं करायचं, यात शेजारी देश नेहमीच आघाडीवर असतो आणि आताही असंच काहीसं घडण्याची चिन्हं आहेत.

बांगलादेशने आपले सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती. पण आयसीसीने ती फेटाळून लावत थेट बांगलादेशची हकालपट्टी केली आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली. हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. आधी त्यांनी बहिष्काराची धमकी दिली, पण आयसीसीच्या दणक्यानंतर निमूटपणे संघ जाहीर केला. आता मात्र, मैदानावर उतरताना बांगलादेशच्या समर्थनार्थ ‘हातावर काळी पट्टी’ बांधून निषेध नोंदवण्याचा पाकिस्तानचा प्लॅन समोर येत आहे. जर पाकिस्तानने असं काही पाऊल उचललं, तर क्रिकेटच्या मैदानात मोठं वादळ उठू शकतं.

T20 World Cup 2026

आयसीसीचे नियम अत्यंत कडक आहेत. कोणत्याही खेळाडूला किंवा संघाला परवानगीशिवाय राजकीय, धार्मिक किंवा वैयक्तिक संदेश देणारी कोणतीही खूण किंवा काळी पट्टी वापरता येत नाही. तुम्हाला आठवत असेल, २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा याने असाच प्रयत्न केला होता, तेव्हा त्याला आयसीसीने सक्त ताकीद दिली होती.

जर पाकिस्तानने ही ‘नापाक’ हरकत केलीच, तर पहिल्यांदा त्यांना वॉर्निंग मिळेल. पण तरीही ते ऐकले नाहीत, तर खेळाडूंच्या मॅच फीमधून २५ टक्के रक्कम कापली जाऊ शकते. थोडक्यात काय, तर बांगलादेशला पाठिंबा देण्याच्या नादात पाकिस्तान स्वतःचंच नुकसान करून घेण्याच्या मार्गावर आहे. ७ फेब्रुवारीपासून या क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होत असून, १५ फेब्रुवारीला होणाऱ्या ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ (India vs Pakistan) सामन्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही